शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! ५ दुधाळ गायी किंवा म्हशी घेण्यासाठी शासनाकडून ७५% पर्यंत अनुदान!

शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! ५ दुधाळ गायी किंवा म्हशी घेण्यासाठी शासनाकडून ७५% पर्यंत अनुदान!


मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना २०२६

महाराष्ट्र शासनाच्या या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाणार आहे.

🔴 योजनेअंतर्गत काय मिळणार?

✅ ५ दुधाळ गायी किंवा म्हशी
✅ जनावरांचा ३ वर्षांचा विमा
✅ गोठा बांधकाम किंवा मुरघास बंकर
✅ दूध काढण्याची मशीन
✅ कडबाकुट्टी यंत्र
✅ इतर आवश्यक साहित्य

💰 एकूण प्रकल्प खर्च : ₹११,३५,१८०
🔹 अनुदान किती मिळणार?
▪️ सर्वसाधारण प्रवर्ग : ५०% अनुदान – ₹५,६७,५९०
▪️ अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) : ७५% अनुदान – ₹८,५१,३८५
🔹 लाभार्थ्यांचा स्वतःचा हिस्सा :
▪️ सर्वसाधारण प्रवर्ग : ₹५,६७,५९०
▪️ SC/ST प्रवर्ग : ₹२,८३,७९५

📋 पात्रता व अटी :

1️⃣ महाराष्ट्रातील पात्र अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक शेतकरी.
2️⃣ स्वतःच्या नावावर किमान १ एकर जमीन किंवा किमान ५ वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा.
3️⃣ वनहक्कधारकांना जमिनीच्या अटीत सूट.
4️⃣ पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा २ वर्षांचा दुग्धव्यवसायाचा अनुभव.
5️⃣ योजनेच्या इतर आवश्यक अटी पूर्ण करणे बंधनकारक.

📑 आवश्यक कागदपत्रे :

▪️ आधार कार्ड
▪️ फार्मर आयडी
▪️ महाआयडी
▪️ ७/१२ उतारा व ८-अ
▪️ बँक पासबुक
▪️ पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा अनुभवाचा दाखला
▪️ जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
▪️ आवश्यक इतर कागदपत्रे

🌐 ऑनलाइन अर्ज पोर्टल :

https://mahadbt2.maharashtra.gov.in/
📞 पशुसंवर्धन विभाग हेल्पलाइन : १९६२

⚠️ महत्त्वाची सूचना :
अनुदान मंजूर होण्यापूर्वी जनावरे खरेदी करू नका. अधिकृत मंजुरीनंतरच शासनाच्या नियमांनुसार खरेदी प्रक्रिया पूर्ण करा. अनुदानाची रक्कम पात्रता व प्रत्यक्ष मंजूर प्रकल्प खर्चानुसार निश्चित होईल.
📢 शेतकरी बांधवांनो, ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा!

📰 APLI NEWS
अन्याय, अत्याचार विरुद्ध बुलंद आवाज

#MaharashtraGovernment #शेतकरीयोजना #दुग्धव्यवसाय #पशुधनउद्योजकता #DairyFarming #MahaDBT #APLINEWS

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने