डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य नऊ कोटी लोकांपर्यंत सीमित नव्हते तर एकशे पस्तीस कोटी लोकांपर्यंत चे आहे.निरंजन जाधव, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा प्रवक्ता , बुलढाणा यांचे प्रतिपादन


आपली न्यूज

बुलढाणा जिल्हा.

दिनांक : २३/०९/२०२२


 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, राष्ट्रीय अध्यक्ष भारतातील तमाम बौद्धांचा बुलंद आवाज आणि स्वाभिमान तथा निर्भीड जागतिक नेतृत्व आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब ,यांच्या जागतिक नेतृत्वाखाली कार्यरत आणि सन्मा.राज्य कार्यकारीणी यांच्या प्रेरणेने व आयु आर एन घेवंदे जि अध्यक्ष यांच्या  आव्हानानुसार गाव तेथे शाखा, संवाद करण्यासाठी निरंजन जाधव प्रवक्ता जि बुलडाणा यांनी वर्षावास कार्यक्रम भेटी दरम्यान मनोगत व्यक्त करतांना विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य केवळ नऊ कोटी दलितांपुरते मर्यादित नाही तर भारताच्या एकशे पस्तीस कोटी भारतीयांसाठी समर्पित होते. साऊथ ब्युरो कमिशन साक्ष मताधिकार,सायमन कमिशन साक्ष,रिझर्व्ह बँक,समान काम समान वेतन, कामाचे आठ तास,अमेरिकेतील टेनेसी व्हॅली कालव्याच्या धर्तीवर ब्रह्मपुत्रा नदी,कोसी नदी प्रकल्प व पंधरा मोठी धरणे,नदीजोड प्रकल्प प्रस्ताव, हिंदू कोडबील आणि मॅटर्निटी लिव्ह,इलेक्ट्रीक बोर्ड निर्मिती, भारतीय संविधान,भारताच्या उद्धारासाठी बौद्धधम्म दिक्षा आणि जागतिक धम्म परिषदेशी आपला संबंध अशी देशासाठी केलेल्या अनेक  राष्ट्रीय कार्याचा उहापोह करून बाबसाहेबांचे देशहितासाठीचे कार्य शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी *आद राजरत्न आंबेडकर साहेबांच्या* जागतिक नेतृत्वाखाली कार्यकर्ता म्हणून काम करण्याचे उपस्थितांना आव्हान केले.या प्रसंगी गंगा फिनाईल एजन्सीतर्फे विहारास पाच लिटर फिनाईल कॅन मोफत देण्यात आली.

   निरंजन जाधव सर,बुलडाणा ते जळगाव जा.100 की मी दूर येऊन वर्षावासाला  रात्रीच्या वेळेला आवर्जून भेट देऊन  मार्गदर्शन केल्याबद्दल उपस्थितांनी  त्यांचे शॉल व पुष्पगुच्छ देऊन मनोभावे स्वागत केले.या कार्यक्रमास परिसरातील धम्मबंधाव बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी सरणत्तय गाथा घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने