खंडोबा मंदिरावर का आलास म्हणून तरुणास जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याचा प्रयत्न पाच जणा विरुद्ध अँस्ट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

 खंडोबा मंदिरावर का आलास म्हणून तरुणास जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याचा प्रयत्न पाच जणा विरुद्ध अँस्ट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल


      चिकाळा येथील तरुण गोविंद मनपूर्वे हा दिनांक 13 ऑगस्ट रोजी अंदाजे 2.30 वा. पंचमी निमित्त खंडोबा मंदिरावर गेला असता तेथे गावातील बाळू मोहन मिसे, व्यंकटेश शेषेराव वाळके, निखिल लक्ष्मण चोंडे, दिपक रामा चोंडे, राजू बंडू चोंडे या सर्वांनी तू आमच्या खंडोबा मंदिरावर का आलास म्हणून जातीवाचक शिवीगाळ करू लागले फिर्यादी ने त्यांना शिवीगाळ करू नका म्हणून विनंती केली असता त्यांच्या खिशातील 1750 रुपये काढून घेवून जातीवाचक शिवीगाळ करत लोखंडी रॉडने जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली व मंदिरा जवळील असलेल्या खड्यात टाकून पुरण्याचा प्रयत्न केला  असे निवेदनात म्हटले आहे. 

      सदरील घटने नंतर फिर्यादी गोविंद मनपूर्वे यांच्या तक्रारी वरून पोलिस स्टेशन तामसा येथे वरील पाच जणांन विरुद्ध भा. द. वि. 326, 323, 504, 506, 143, 147, 148, 3(1)(r) नुसार 14 ऑगस्ट रोजी रात्री 10 च्या दरम्यान गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावेळी भिम टायगर सेना जिल्हा अध्यक्ष मिलिंददादा गायकवाड, जिल्हा संपर्क प्रमुख राहुलदादा सोनकांबळे, भोकर तालुका अध्यक्ष प्रतिकदादा कदम, विजय जाधव, सम्यक चौदंते, सचिन राऊत, मातुळचे दिगंबर कदम, चिकाळा येथील सुरेश कदम, सदानंद कदम, रत्नदीप कदम, माधव मनपूर्वे, मारोती मनपूर्वे, राजू मनपूर्वे, राजेश मनपूर्वे, आडेलू भुरभूशीकर इत्यादि उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

📺 Apli News YouTube

आपली न्यूजचे ताजे व्हिडिओ, बातम्या आणि अपडेट्स YouTube वर पाहा.

▶ YouTube Channel