प्रभारी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार राजेश लांडगे यांची माहिती.
आपली नूज : सतीश भवरे
भोकर ( नांदेड )
दिनांक :- 10/09/2022
भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्याच्या डाटाचे प्रमाणिकीकरण करण्यासाठी मतदारांचे निवडणूक ओळखपत्राशी आधार लिंकींग करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअन्वये 85-भोकर विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर शनिवार 10 सप्टेंबर व रविवार 11 सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. मतदारांनी या मासिक शिबिरात निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करुन घ्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार राजेश लांडगे यांनी केले आहे.
मतदारांनी निवडणूक ओळखपत्रास आधार लिंकींग करण्यासाठी Voter helpline ॲपचा वापर करावा. याचबरोबर संबंधित बीएलओ, तहसिल कार्यालय भोकर येथील निवडणूक विभाग तसेच भोकर तालुक्यातील सुविधा केंद्रावर हे काम विनामुल्य आहे.
जनतेनी मतदान व आधार जोडणी करून सहकार्य करावे.