आपली न्युज पोर्टल
दिनांक 02 जुलै 2021
महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद राज्याध्यक्ष जितेंद्र भोसले असलेल्या व जनतेच्या हक्कासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नावारुपास असलेल्या सरपंच परिषदेच्या उस्मानाबाद महिला जिल्हाध्यक्ष पदी श्रीमती नगीना सोमनाथ कांबळे यांच्या कार्याची दखल घेऊन निवड करण्यात आली.
राज्याध्यक्ष जितेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली श्रीमती नगीना सोमनाथ कांबळे यांनी केलेंल्या जनतेच्या लढ्यासाठी व सामाजिक कार्याची दखल घेऊन सरपंच परिषद अधिक बळकट करण्यासाठी ही निवड करण्यात आली. यांची समाजाविषयी कार्य करण्याची तळमळ व लढाऊ वृत्ती सरपंच परिषदेला पुढे नेण्याचे त्यांचे कौशल्य पाहुन ही निवड करण्यात आली आहे. त्यांना उस्मानाबाद महिला जिलहाध्यक्ष म्हणुन नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ व राज्य सचिव सौ. मंदाकिनी सावंत यांची मुख्य उपस्थिती होती. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. सर्वत्र त्यांच्या निवडीचे अभिनंदन होत आहे.