मान्यवर वृद्ध कलावंत व साहित्यिकांच्या मानधन निवडीची प्रक्रिया तब्बल दोन वर्षांपासून रखडली !

 मान्यवर वृद्ध कलावंत व साहित्यिकांच्या मानधन निवडीची प्रक्रिया तब्बल दोन वर्षांपासून रखडली  !



जिल्हास्तरीय समितीच्या पूनर्गठनासाठी बहुजन टायगर युवा फोर्स आंदोलनाच्या पावित्र्यात!

..

नांदेड-

     राजर्षी शाहू महाराज साहित्यिक व कलावंत मानधन निवडीसाठीची जिल्हास्तरीय समिती पूनर्गठित नसल्याने मान्यवर वृद्ध कलावंत व साहित्यिकांच्या मानधनांचे प्रस्ताव गत दोन वर्षांपासून मान्यतेविना असून समितीच्या  पूनर्गठनासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अतुल सावे यांच्याकडे पाठपुरावा करावा अशी आग्रही मागणी समितिच्या सदस्या तथा,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आज निवेदनातून करतांनाच याबाबत दूर्लक्ष केल्यास येत्या दि.२१ मार्च रोजी नांदेडच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्याचा ईशारा बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा.भवरे यांनी दिला आहे.

        अधिक माहिती अशी की, सन् २०२३-२४ या वर्षात मान्यवर वृद्ध कलावंत व साहित्यिक मानधन निवडीची प्रक्रिया जिल्हास्तरीय समिती पूनर्गठन नसल्याने रखडली होती.त्यानंतर,शासन परिपत्रकानुसार सदरची समिती नामकरणासह काही बदल करण्यात आले. त्यानुसारचीही राजर्षी शाहू महाराज साहित्यिक व कलावंत मानधन निवड जिल्हास्तरीय समिती पूनर्गठित नाही.त्यामूळेच सन् २०२३-२४ व २०२४-२५ या दोन्ही वर्षाचे अर्ज व प्रस्ताव मागविण्यात आलेले असले तरिही त्यांची छाननी करुन अद्याप पात्र ठरविण्यात आलेले नाहीत.यासाठीच्या समितीचे पूनर्गठन नसल्यानेच त्याबाबतची कार्यवाही थांबल्याची माहिती संबंधित विभागाकडून दिलो जात आहे. परिणामी आर्थिक मदतीविना लाभार्थींची परवड होत असल्याची बाब जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अतुल सावे यांच्या निदर्शनास आणून द्यावी सोबतच,सदरची समिती पूनर्गठित व्हावी यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी समितीच्या सदस्या तथा,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे बहुजन टायगर युवा फोर्स च्यावतिने करण्यात आलेली असून या निवेदनाच्या प्रति नांदेडचे जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस अधिक्षक,जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी आदींना पाठविण्यात आल्या आहेत.

    महत्वाचे म्हणजे,भारतीय संस्कृतीत लोकपारंपारिक कला जीवंत ठेवण्यासाठीच कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे महान कार्य कलावंत करित असतात.त्यांना शासनाकडून देण्यात येत असलेली आर्थिक मदत वाढविण्यासह मान्यवर वृद्ध कलावंत व साहित्यिकांच्या न्याय व हक्कासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असून गत अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या पुर्णत्वासह राज्यातील रखडलेल्या नांदेडसह अनेक जिल्हास्तरीय समितींच्या पूनर्गठनासाठी आगामी काळात आंदोलनात्मक भूमिका घेत यापूढेही प्रसंगी आक्रमकपणे रस्त्यावर उतरुन संघर्ष करणार असल्याचे बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र व पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा.भवरे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने