आमदार संजय गायकवाड यांनी अट्रॉसिटी कायदा विरोधात वक्तव्य केल्या प्रकरणी त्यांचेवर गुन्हा दाखल करावा बाबत भीम टायगर सेनेचे निवेदन

.

आपली नुज

सतीश भवरे ( भोकर तालुका प्रतिनिधी )

दि. 04/07/2021

       भोकर तालुका भीमटायगर सेनेच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांनी अट्रॉसिटी कायद्याविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर अट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा. याबाबत भीम टायगर सेना भोकर च्या वतीने भोकर पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले.

        सविस्तर वृत्त असे की, खामगाव तालुक्यातील चितोडा गावातील एका अनुसूचित जातीच्या व इतर समाजातील व्यक्तीचे भानगड होऊन अट्रॉसिटी कायदा अन्वय गुन्हा दाखल झाला. त्या संबंधात आमदार संजय गायकवाड यांनी अट्रॉसिटी करेल त्या विरोधात  चोरी, दरोडा या प्रकारचं वक्तव्य करून धमकी दिली आहे. त्यामुळे अनुसूचित जाती, जमाती च्या लोकांच्या भावना दुःखवून अपमान केला आहे. तेव्हा आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात अट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा. असे मागणीचे निवेदन भोकर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना दिले.

       या निवेदनावर भीमटायगर सेना जिल्हा अध्यक्ष मिलिंद गायकवाड, जिल्हा संपर्क प्रमुख राहुल सोनकांबळे, तालुका अध्यक्ष प्रतीक कदम,   उपाध्यक्ष भीमराव हनवते, महासचिव सुनील गुंडेराव, शहर अध्यक्ष माजित शेख, तालुका संघटक सचिन राऊत, भीम टायगर विजय दवणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

📺 Apli News YouTube

आपली न्यूजचे ताजे व्हिडिओ, बातम्या आणि अपडेट्स YouTube वर पाहा.

▶ YouTube Channel