भारतीय आदिवासी पॅन्थर संघटनेच्या भोकर महिला आघाडी (पारधी ) तालुका अध्यक्ष पदी अरुणाबाई नानाराव चव्हाण यांची निवड.

 भारतीय आदिवासी पॅन्थर संघटनेच्या भोकर महिला आघाडी  (पारधी ) तालुका अध्यक्ष पदी अरुणाबाई नानाराव चव्हाण यांची निवड.


आपली न्यूज : सतीश भवरे

मोबाईल : ८४४६२७३६६७

भोकर ( नांदेड )


भोकर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या अरुणाबाई नानाराव चव्हाण यांच्या कार्याची व आदिवासी समाजाप्रती असलेली तळमळ याची दखल घेऊन संघटना प्रमुख प्रशांत बोडखे यांनी आदिवासी पॅन्थर संघटना महिला आघाडी तालुका अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. 

अरुणाबाई चव्हाण या सदैव पारधी समाजाच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करतात. संघटना कार्यक्रमात त्यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन ही निवड करण्यात आली. राज्य उपाध्यक्ष तुळशीराम खोटरे, सचिव सोहन म्हरसकोल्हे, जिल्हा अध्यक्ष धनराज सोनटक्के व पारधी समाज नांदेड जिल्हा प्रमुख अशोक राठोड यांच्या हस्ते नियुक्ती प्रदान करण्यात करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांनी पदाला न्याय मिळेल अशी कामगिरी करेल. अशी भावना व्यक्त करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

📺 Apli News YouTube

आपली न्यूजचे ताजे व्हिडिओ, बातम्या आणि अपडेट्स YouTube वर पाहा.

▶ YouTube Channel