विद्यार्थ्याच्या व नागरिकांच्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन भीमराव भुक्तरे जिल्हाअध्यक्ष बहुजन युथ पॅन्थर नांदेड यांची माहिती.



आपली न्‍युज

नांदेड प्रतिनिधी

दिनांक : 02/03/2023


        गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी स्वाधार योजनेपासून वंचित आहेत. त्यांना शिक्षण घेणे घेणे अवघड होत आहे. तसेच विविध मागण्यासाठी,  गरीब, होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे वंचित राहू शकतात करिता आपण विषयावर तात्काळ कारवाई करून विद्यार्थ्याना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी केली आहे. निवेदनात खालील मागण्यासाठी आंदोलन करण्यात येईल. अश्या विषयी निवेदन देण्यात आले आहे.

       

१) स्वाधार ची रक्कम तात्काळ विद्यार्थ्याच्या खात्यात जमा करा.


२) सर्व विद्द्यार्थ्याना सरसकट  स्वाधार योजनेचा लाभ देण्यात यावा.


३) २०२३ स्वाधार योजनेतीलमधील जाचक अटी रद्द करावी.


४)  बार्टी ची शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी करणे.


५)  रमाई घरकुल आवास योजना चा निधी ५ लाख करावा.


६) महामंडळ च्या योजना केवळ बेरोजगारांसाठी   राबवाव्यात.


७) बार्टी प्रकल्प कार्यालय नांदेड, येथील झालेल्या अपहारची चौकशी करा.


८)  महामंडळ कर्ज प्रकरणाच्या जाचक अटी रद्द करावी.


9)  विद्यार्थ्याची  भारत सरकार शिष्यवृत्ती महागाई  निर्देशांक नुसार वाढवण्यात यावी. यावर योग्य ती कार्यवाही करावी.  अन्यथा वरील सर्व  मागण्यांसाठी विद्यार्थ्याना व नागरीकांना घेवून आपल्या कार्यालयासमोर दिनांक ०३-०३-२०२३ रोजी तीव्र धरणे  आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे.

              


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने