पहिले ग्रामीण शेतकरी शेतमजूर काव्‍यसंमेलन मौजे बटाळा ता.भोकर जि.नांदेड येथे संपन्‍न

 

सत्‍यशोधक लेखणीव्‍दारा आयोजीत

रिपब्‍लीकन कार्यकर्ते मुर्तीकार शाहीर व जलसाकार माणिकराव कदम यांच्‍या स्‍मृतीस समर्पीत

 पहिले ग्रामीण शेतकरी शेतमजूर काव्‍यसंमेलन मौजे बटाळा ता.भोकर जि.नांदेड येथे संपन्‍न


थेट बांधावर

उद्घाटक :      मा.दिनेशजी हनुमंते ( बौध्‍दमहासभा मुख्‍य संघटक महाराष्‍ट्र राज्‍य भारतीय बौध्‍दमहासभा )

कार्यक्रमाचे अध्‍यक्ष : गौतमजी खिल्‍लारे सुप्रसिध्‍द (गायक,कॉल्‍ट्राकटर बांधकाम,माजी सरपंच)

प्रमुख अतिथी    : अॅड रामजी कांबळे , पत्रकार सतिष भवरे

प्रमुख उपस्थिती (कवी) : कवी संजयजी कदम , कवी गायक क्रांतीकुमार पंडीत,

कवी बाबुरावजी खिल्‍लारे , गौतम कांबळे टाकळीकर

 शेतकरी-शेतमजुरांचे कवी मुल, उत्तम प्रतीचे प्रतिभाशाली कवी होत! अॅड.रामजी कांबळे

सतिश भवरे भोकर 07/03/2021

       सम्मेलनाच्या सुुुुुुुुुरुवातीस माणिकराव कदम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन सुुुुुुुरुवात करण्‍यात आली.सम्मेलनाचे स्वागत अध्यक्ष तथा पार्डी बु. चे सरपंच प्रकाशजी मगरे व मुख्य आयोजक श्रावण तेले यांच्या हस्ते उपिस्थीत सर्व कवी व मान्यवरांना पुस्तक , पुष्पहार व फळस पूलांचा गुच्छ देऊन, निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिक फूलांनी स्वागत करण्यात आले.या काव्य सम्मेलनाचे उदघाटन दी बुद्धिस्ट सोसायटी अॉफ इंडिया चे महाराष्ट्र राज्य मुख्य संघटक आयु.दिनेश हनुमंते यांच्या हस्ते झाले.सम्मेलनाच्या अध्यक्षस्थानी असलेले आयु.गौतम खिल्लारे यांनी समाजातील अनेक पैलूवर काव्य रचना केल्या. तसेच ' शेतकरी-शेतमजुर यांच्या बाबतीत फार सुंदर काव्य रचना गौतम खिल्लारे यांनी सादर केल्या.

निंदनाच्या गुत्यात जायची तेव्हा

पाच वाजता भाकरी थोपायची,,,

झोपेत असतांना त्या आवाजाची

धुन आमच्या कानात गुंजायची...!!!

 

सोयाबीन कापताना कम्बरेचे

हाड कड कड वाजायचे,,,

पाच बॅग असूनही शेतवाले चार

बॅग आहेत म्हणुन सांगायचे...!!!

 

हाब्रिटीचे कणसं वाहातांना पायात

कधी कधी चिपाडही घुसायची,,,

कडब्याच्या पेंड्या खाली कधी

मोठी मोठी सापही दिसायची...!!!

 

हारबऱ्याच्या त्या आंबीन लाल

होत होती फोडे हाताची,,,

त्या फोडांना चुलीवर शेकून

तशीच डोळे झाकायची...!!!

 

वात येत असतांना सुद्धा तु

कापूस वेचायला जायची,,,

नको जाऊ म्हटलं तर मग काय

खावं बाळा अस म्हणायची...!!!

 

गहू कापतांना ऊन डोक्यावर

खूप आगी सारख तापायचं,,,

तळ हातात कूसळ घुसत कधी

विळ्याने बोट कापायचं...!!!

      काव्य सम्मेलनात नांदेड येथील प्रसिद्ध मुर्तीकार, जलसाकार माणिकराव कदम यांचा मुलगा तथा भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आयु.संजय कदम यांनी त्यांच्या अनेक विभिन्न काव्य रचना सम्मेलनात सादर केल्या.

 

"नांगरनी वघरनी शेती माझा धंदा,

शेतात पीक मी घेऊ कोणते यंदा,

कापूस सोयाबीन सोडून मी काय पेरावे ?

बोअर नाही विहिर नाही,

स्वप्न केळी ऊसाचे का पहावे ?

मेथी, लसन,नाही लाऊ शकत कांदा...!!!

शेतात पीक, मी घेऊ कोणते यंदा?

नांगरनी वघरनी शेती माझा धंदा,

शेतात पीक मी घेऊ कोणते यंदा,"

 

" गाय,भैस,सोडा,बैल खुटयाला एकही नाही,

पेरणी कशी करावी, मला कळेना काही,,,

ह्या ही वर्षी लग्नाला आली लहान मंदा...!!!

शेतात पीक मी घेऊ कोणते यंदा ? "

      त्यानंतर कवी गौतम कांबळे, टाकळीकर यांनी देखील फारच सुरेख काव्य रचना सादर केल्या.

"कधीकधी माय निराश

 होऊन यायची घरी । ।

आता काय खाऊ घालू

 माझ्या पिलांना? असी चिंता

 असायची तीच्या मोऱ्ही । ।"

नांदेड मधील तुपा येथील सुप्रसिद्ध भीमशाहीर व कवी कुमार पंडीत यांनी सुधा खुपच छान रचना सादर केल्या.

        तसेच ग्रामीण शेतकरी-शेतमजुर यांच्या रचनांचे संग्रहण करण्याची आवड असणारे बाबुराव खिल्लारे,पत्रकार सतिष भवरे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.ऐतिहासिक आणि पहिल्या शेतकरी-शेतमजुर काव्य सम्मेलनास यशस्वी करण्यासाठी सम्मेलनाचे मुख्य आयोजक श्रावण तेले, प्रकाश जी. चंद्रे, प्रमोद चौदंते, दीक्षाभुमी डोंगरे यांनी परिश्रम घेतले.

2 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने