डॉ. कैलास कानिंदे रेणापूरकर यांना अमेरिकेतील प्रतिष्ठित मानद डि.लीट. पदवी मिळाल्याबद्दल सत्कार

डॉ. कैलास कानिंदे रेणापूरकर यांना अमेरिकेतील प्रतिष्ठित मानद डि.लीट. पदवी मिळाल्याबद्दल सत्कार


भोकर तालुका व्हॉइस ऑफ मिडिया कडून सन्मान

भोकर ( प्रतिनिधी )

भोकर सामाजिक, शैक्षणिक, तालुक्यातील राजकीय, पत्रकारिता, आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन करणारे डॉ.प्रा. कैलास गणपतराव कानिंदे रेणापूरकर यांना त्यांच्या आंतरराष्ट्रीय संशोधन कार्याचा आढावा घेऊन युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका ने डी.लीट. पदवी प्रदान करून सन्मानित केले असल्याने भोकर तालुका व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. रेणापूर तालुका भोकर येथील पत्रकार प्रा. डॉ. कैलास कानिंदे यांना युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका ने डी. लीट. पदवीने सन्मानित केले आहे. त्यांच्या अथक परिश्रम संशोधनातील उत्कृष्टता आणि शैक्षणिक क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानामुळे त्यांना ही प्रतिष्ठित पदवी मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा यथोचित सन्मान व्हावा म्हणून भोकर तालुका व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघाकडून पत्रकार तथा प्रा. डॉ. कैलास कार्निदे यांचा दि.१७ फेब्रुवारी रोजी भोकर रुरल फार्मस प्रोडुसर कंपनीत शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्या ज्योती सरपाते मॅडम, तालुका अध्यक्ष दत्ता बोईनवाड, माली पाटील, जेष्ठ पत्रकार अनिल डोईफोडे, बी. प्रकाश व कंपनीचे अध्यक्ष माधव पा. सलगरे , धम्मपाल पाटील आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने