परभणी येथील घटनेचा राष्ट्रप्रेमी भारतीय नागरीकांच्या वतीने भोकर येथे निषेध


भोकर ( प्रतिनिधी ) परभणी शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीला एका माथेफिरूने दगड मारुन काच फोडला ही घटना मंगळवार १० डिसेंबर रोजी घडली या घटनेनंतर आज ता ११ डिसेंबर रोजी भोकर येथील राष्ट्रप्रेमी भारतीय नागरीक व आंबेडकरी जनतेत तिव्र पडसाद उमटून त्या घटनेचा तिवृ निषेध नोंदवला असून संबंधित माथेफिरुवर कडक कारवाई करून त्या आरोपीस फाशी ची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनाव्दारे राष्ट्रप्रेमी भारतीय नागरीकांच्या वतीने मुख्यमंत्री देवेद्रं फडणवीस यांना भोकर तहसीलदार मार्फत मागणी केली आहे रेल्वे स्टेशनसमोर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा आहे पुतळ्यासमोर काचेच्या बॉक्समध्ये संविधानाची प्रतिकृती आहे मंगळवारी दुपारच्या सुमारास एका माथेफिरुने या प्रतिकृतीवर दगड मारला त्यामुळे विटंबना झाली त्या घटनेचा तीव्र शब्दात राष्ट्रप्रेमी भारतीय नागरीकांच्या वतीने निषेध करण्यात आला व विनटंबना करणाऱ्या माथेफिरूवर कठोर कारवाई करून फाशी ची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रप्रेमी भारतीय नागरीकांच्या व आंबेडकरी जनतेतुन करण्यात आली या वेळी डॉ साईनाथ वाघमारे ,जयभीम पाटील ,डॉ विजयकुमार दंडे,डॉ प्रज्वलीत सोनकांबळे , सुंधाशु कांबळे डॉ कैलास कानिंदे, गौतम कसबे , सुलोचना ढोले , विक्रम क्षिरसागर ,कपील कांबळे , सिद्धार्थ जाधव ,संदीप गायकवाड , शंकर कदम ,मनोज शिंदे , संतोष डोंगरे ,यशोदाबाई महाबळे, द्वारकाबाई कांबळे,आनंद ढोले, दयानंद गुंडेराव,दलित डोंगरे, अविनाश गायकवाड, सतिश जाधव, भिमराव हनवते , साहेबराव वाहुळकर, गोविंद थोरात, राजेश वाघमारे, प्रशांत कानडे, सचिन देवाले,साहेबराव हनमंते, गणेश वाघमारे,  गंगाधर भवरे, नागसेन दुधारे, मिलिंद दुधारे, आशिष वाघमारे , आदित्य वाघमारे, तथागत गाडेकर, सतिश गुंडेराव, सुमित खंडेलोटे, मनोज मोरे, भागवान जाधव, कैलास कदम ,अभिनंदन दांडगे, ,वंसंत जाधव, शाक्यशासन पाटील, नरेंद्र मोरे, बंटी वाघमारे, ईर्शाद ईनामदार , शन्न्नुभाई शेरवाले , जुनेद , मिर्जा आक्रम , दिगांबर कांबळे , विश्वजीत जळपतराव आदि राष्ट्रप्रेमी नागरीकासह उपस्थित होते




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने