नांदेड
जिल्ह्यातील सर्व मंदीर,मस्जीद,गुरुव्दारा,गिरीजाघर,बौध्दविहार
व इतर धार्मिेक प्रार्थना स्थळे दि. 18 मार्च 2021 ते
दि. 31 मार्च 2021 या
कालावधीमध्ये पूर्णपणे बंद मा.जिल्हाधिकारी नांदेड यांचे आदेश असून सदरील
आदेशाचे भोकर तालुक्यातील नागरीकांनी पालन करावे उपविभागीय अधिकारी राजेंद्र
कंधारे यांचे आवाहान
(आपली
न्युज भोकर प्रतिनिधी
)
दि.19 मार्च 2021
कोविड-19
विषाणूंच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झापाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाययोजनेच्या
अनुशंगाने पारित केलेल्या आदेशाचे पालन करावे असे आवाहन भोकर येथील उपविभागीय
अधिकारी राजेंद्र कंधारे यांनी भोकर तालुक्यातील नागरीकांना आवाहान केले आहे.
नांदेड
जिल्हयातील सर्व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी भाविकांची गर्दी होत आहे. त्यामुळे
जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय
योजनेचा एक भाग म्हणून नागरीकांनी एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नांदेड
जिल्ह्यातील सर्व मंदीर,मस्जीद,गुरुव्दारा,गिरीजाघर,बौध्दविहार व इतर धार्मिेक प्रार्थना स्थळे
दि. 18 मार्च 2021 ते दि. 31
मार्च 2021 या
कालावधीमध्ये पूर्णपणे बंद राहतील या धार्मिक व प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी
सबधित धर्मगुरु हे त्या ठिकाणी नित्य नियमाप्रमाणे धार्मिक विधी करतील या व्यतिरीक्त
इतर कोणतेही भावीक/ बाहेरील व्यक्ती अशा धार्मिक स्थळी प्रवेशास याव्दारे दिनांक
31 मार्च 2021 पर्यत बंदी घालण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व दुकाने
दि. 18 मार्च 2021 ते दि. 31 मार्च 2021 या
कालावधीत सकाळी 07.00 वा. ते सायंकाळी 05.00 वा. या कालावधीत कोरोना प्रतिबंधक सर्व
उपाययोजनांचे पालन करुन चालू राहतील. सदर
निर्बंध औषधी दुकानांसाठी लागू राहणार नाहीत.संबंधित विभागांनीजनजागृती सप्ताह
सुरु करुन जास्तीत जास्त प्रचार प्रसिध्दी करुन नागरीकांमध्ये कोविड-19 बाबतचे
मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बाबतचे जनजागृती करावी.तसेच कोविड-19 बाबतची
शासनाच्या मार्गदर्शक सूचना जसे मास्क, सामाजिक अंतर राखणे, हॅन्ड सेनीटायझरचा
वापर इ. सर्व नागरीकांना बंधनकारक राहील.
मा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशाचे सर्व
नागरीकांनी पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहान उपविभागीय अधिकारी
राजेंद्र कंधारे यानी केले आहे.