वंचित बहुजन आघाडी भोकर तालुका सचिव पदी राजू दांडगे यांची निवड

वंचित बहुजन आघाडी भोकर तालुका सचिव पदी राजू दांडगे यांची निवड

 

आपली न्‍युज
भोकर प्रतिनिधी :- सतिश भवरे  
दि. 19 मार्च 2021 
    भोकर नगर परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वंचित बहुजन आघाडी पक्ष बळकट करिता श्रध्‍देय नेते अँड बाळासाहेब  आंबेडकर यांच्‍या आदेशानुसार भोकर येथील शासकीय विश्रामगृह येथे दि.15/03/2021 रोजी बैठक पार पडली. या बैठकीमध्‍ये विविध विषयावर चर्चा झाली. भोकर येथील विविध समस्‍या काय आहेत. यांची माहिती घेऊन कार्यकर्ते यांचे म्‍हणने लक्षात घेऊन आलेल्‍या मान्‍यवरांनी आपली भूमिका मांडली. यावेळी वंचित बहुजन आघाडी पक्ष बळकट करण्‍यासाठी व श्रध्‍देय नेते बाळासाहेब आंबेडकर यांचे कट्टर विश्‍वासू कार्यकर्ते याना निवड करुन नियुक्‍तीपत्र देण्‍यात आले.

      

    यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजू दांडगे यांचे कार्य लक्षात घेता त्‍यांची भोकर तालुका सचिव पदी निवड करण्‍यात आली. यावेळी पक्ष निरिक्षक डोके, जिल्‍हाध्‍यक्ष उत्‍तर प्रशांत इंगोले, तालुका अध्‍यक्ष सुनिल कांबळे, गजानन ढोले इत्‍यादी नेते कार्यकर्ते , महिला उपथित होते.यावेळी राजू दांडगे यांचे सर्व स्‍तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने