भीम टायगर सेनेच्या वतीने लॉकडाऊन विरोधात व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक भोकर येथील अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी आंदोलन
- भोकर तालुका भीम टायगर सेना यांच्या वतीने लोकशाही मार्गाने कोरोना नियम पाळून लाकडाऊन विरोधात व डाँ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भोकर येथील अतिक्रमण हटविण्यात यावे. करिता आज रोजी सदर चौकात आंदोलन करून निषेध करण्यात आला.
- या आंदोलनास भीम टायगर सेना जिल्हाअध्यक्ष मिलिंद गायकवाड रेणापूरकर, जिल्हा संपर्क प्रमुख राहुल सोनकांबळे उपस्थित राहून मार्गदर्शन केले. जिल्हाअध्यक्ष हे बोलताना म्हणाले की, कोरोना हे एक षडयंत्र असून सर्व सामान्य जनतेला वेठीस शासन आणत आहे. गोर गरीब, मजूर यांचे अत्यंत हाल होत आहेत. लाकडाऊन न हटविल्यास लढा देणे सुरु राहील. पुढील झालेल्या घटनेस प्रशासन जबाबदार राहील. तालुका अध्यक्ष प्रतीक कदम यांनी बोलताना म्हणाले की, डाँ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील अतिक्रमण न हटविल्यास भीम टायगर सेना महाआंदोलन करेल. यावेळी तालुका उपाध्यक्ष भीमराव हनवते, शहराध्यक्ष मजिद शेख भोकर, तालुका संघटक सचिन राऊत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.