मौजे दिवशी येथील पाच वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला ६१ दिवसांत मृत्यूदंडा ची शिक्षा

मौजे दिवशी येथील पाच वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला ६१ दिवसांत मृत्यूदंडा ची शिक्षा



आपली न्युज

भोकर प्रतिनिधी सतीश भवरे

भोकर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

           भोकर ( प्रतिनिधी ) येथील जिल्हा सत्र न्यायालयाने भोकर तालुक्यातील मौजे दिवसी बु मधील एका बलात्कार प्रकरणात आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. तालुक्यातील दिवशी बु या गावातील एका व्यक्तीने पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता.

 भोकर येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश मुुजीब शेख यांनी बलात्कार प्रकरणात आरोपीला मृत्यू दंडाची शिक्षा सुनावली आहे भोकर तालुक्यात्तील एका व्यक्तीने पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता त्यानंतर कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे गुन्हाच्या ६१ दिवसांनतर आरोपीला शिक्षा झाली आहे. तसेच कोर्टाने पोलिसांनी या प्रकरणी दाखवलेल्या तत्परतेबद्दल कौतुक केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ३० वर्षीय तरुणाने ५ वर्षाच्या मुलीस कुरकुऱ्याचा पुडा दिला मुलगी तिच्या घराजवळच खेळत होती तिला जवळच्या शेता जवळ नेवुन तिच्यावर बलात्कार करून तिचा खुन केला होता ता २० जानेवारी २०२१ ची ही घटना आहे मौजे दिवशी (बु ) येथील सालगडी नराधम आरोपी बाबुराव सांगेराव  हा पाच वर्षाच्या मुलीस शेतातून दुपारी दोन वाजता च्या सुमारास सुधा नदीकाठी गवतात नेऊन तिच्यावर नको ते अत्याचार केले नराधमाने तिच्या अंगावर अनेक ठिकाणी चावा घेऊन लचके तोडले होते बलात्कार करून तिचे हात पाय मोडून टाकले मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा सर्वत्र निषेध झाला होता भोकर पोलिसांनी या घटनेचा तात्काळ छडा लावून आरोपी विरुद्ध कलम ३६३ , ३०२ , ३७६ (अ ),(आय) (जे)पोस्को आणि तपासानंतर अनैसर्गिक कृत्ये ३७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली होती चिमुकलीला नग्न अवस्थेमध्ये एका नाल्याच्या स्थळी आढळून आला आरोपी ही त्याच ठिकानी एका खड्यात लपुन बसला होता त्या आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी सांगितलं की, आरोपीला जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवलं असून पोक्सो अंतर्गत त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणात तात्काळ कारवाई करण्यात आली आणि आवश्यक ते पुरावे गोळा करण्यात आले.चार्जिशिट दाखल करण्यात आली आणि ६१ दिवसांमध्ये ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दाखवलेल्या तत्परते बद्दल न्यायालयाने कौतुक केले हे एक आदर्श उदाहरण असून या गुन्ह्यातील तपास पुर्ण करूण दोष आरोप १९ दिवसामध्ये ता. १०/०२/२०२१ रोजी अति.सत्र न्यायालय १ भोकर यांचे न्यायालयात दाखल करण्यात आले.सरकार पक्षातर्फे एकुण १५ साक्षीदार तपासण्यात आले.फिर्यादी साक्षीदाराची साक्ष पुरावा,वैद्यकिय पुरावा व आरोपी विरूद्ध सबळ पुरावा आधारे आरोपी दोषी ठरविण्यात आले.तर सरकार पक्षा तर्फ अॅड. रमेश राजुरकर सरकारी वकील यांनी काम पाहिले.तसेच फिर्यादी पक्षातर्फे सरकारी वकीलांना सहकार्य केले. अॅड. स्वप्नील कुलकर्णी अॅड. सलीम शेख यांनी मदत केली तर पैरवी आधिकारी एपीआय सुनील डेडवाल, पोहेका.फिरोज खाँ पठाण यांनी काम पाहीले सर्व कलमानुसार कलम ३६३, ३०२, ३७६ (अ),३७६(2)(जे ),(एम), ३७६(अब), ३७७ भादवी कलम ४,,,१०,१२, पोक्सो कायदा प्रमाणे आरोपीस दोषी धरून फाशीच्या शिक्षे शिवाय पर्याय नाही म्हणुन आरोपीस फाशीची शिक्षा सुनवण्यात आली तर  पोलिस निरीक्षक अधिकारी विकास पाटील यांनी सांगितलं की, सुनावणीवेळी १५ प्रत्यक्षदर्शी आणि डॉक्युमेंट्स कोर्टामध्ये सादर करण्यात आले होते


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने