गृहमंत्री
अनिल देशमुख यांचा राजीनामा
सतिश भवरे,भोकर (नांदेड)
आपली न्युज
मो.नं. 8446273667
आज दिनांक 05 एप्रिल 2021 सोमवार
रोजी राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
यांना आपला राजीनामा दिला आहे. राजीनाम्यात ते म्हणाले की मा. उच्च न्यायालय,
मुंबई यांच्याकडे अॅड. जयश्री पाटील यांचेव्दारे दाखल याचिकेमध्ये आज दिनांक 5
एप्रिल रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सी.बी.आय.
मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत. त्या अनुषंगाने मी,
मंत्री गृह या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत:
हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे. सबब मला मंत्री गृह या पदावरुन
कार्यमुक्त करावे.
अशा
प्रकारचे पत्र उध्दव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र
राज्य यांना देण्यात आलेले आहे.