सतिष भवरे, आकाश गजघाट, जय लोखंडे, प्रशांत नरवाडे, आनंद आटकोरे यांना राज्यस्तरीय युवा धम्मभूषण तर सुमनताई जोंधळे, कोयल ढवळे, धम्मलेश सांगोडे, बाबुराव घेवंदे, रविंद्र बच्छाव यांना राज्यस्तरीय गौरव पुरस्कार जाहीर
➖➖➖➖➖➖➖➖➖
नांदेड / 17
भोकर तालुक्यातील थेरबन येथील तरुण सतिष भवरे हे गत 15 वर्षा पासून धम्म चळवळीत सातत्याने सक्रिय आहेत. त्यांनी आपले सहकारी श्रावण तेले, दीक्षाभूमी डोंगरे, सुष्मित हिरे यांच्या सहकार्याने सम्राट अशोका यांचा जन्मोत्सव दर फाल्गून पोर्णिमास करुन , बौद्ध धम्माचे वेगळे आस्तीत्व समाजात दाखवण्याचा प्रयत्न केला. सतत गांवोगांवी फीरुन साप्ताहिक वंदना बुद्धविहारात सुरु केल्या. विहाराची स्वच्छता , लहान मुलांना संस्कार , धम्म विचाराची गोडी बौद्ध उपासक-उपासिकांना लावण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले आहेत. 2017 मध्ये त्यांची भारतीय बौद्ध महासभा भोकर तालुकाध्यक्ष पदी निवड झाली. त्या नंतर त्यांनी संस्थेचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू स्मृतीशेष अशोकराव मुकुंदराव आंबेडकर व बौद्धांचे जागतिकस्तरावरील नेतृत्व मा.राजरत्न आंबेडकर साहेब यांचा फार मोठा कार्यक्रम नोव्हेंबर 2017 मध्ये घेतला. आणि त्यांचे कार्य गतीने वाढतच गेले. आज त्यांच्या कार्याची दखल घेत बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर कार्य करणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणांचा सन्मान करुन महामानवास अभिवादन करणे. या विचाराने प्रेरीत बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय जयंती महोत्सव समिती ने सतिष भवरे यांना राज्यस्तरीय युवा धम्मभूषण पुरस्कार जाहिर केला आहे. त्यांच्या सोबत सोलापूर जिल्ह्यातील आकाश गजघाट, कुरुंद्याचे जय लोखंडे, जवळा पांचाळ चे आनंद आटकोरे, कुर्तडीचे प्रशांत नरवाडे यांनाही राज्यस्तरीय युवा धम्मभूषण पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.
तसेच धम्म चळवळीत दीर्घ काळ काम करणारे बुलढाणा जिल्ह्यातील बाबुराव घेवंदे, नांदेड मधील महिला असूनही महाराष्ट्र भर सक्रिय कार्य करणाऱ्या सुमनताई जोंधळे, नाशिक जिल्ह्यातील पोलिस प्रशासनात नोकरी करुन चळवळीत वेळ देणारे रविंद्र बच्छाव, भंडारा जिल्ह्यातील रहिवासी व मुंबई सह महाराष्ट्रात क्रियाशील असलेले धम्मलेश सांगोडे आणि कंधारचे कोयल ढवळे यांना राज्यस्तरीय धम्मकार्य गौरव पुरस्कार जाहिर झाला आहे.
सध्या देशात व महाराष्ट्रात कोरोणा महामारीचे संकट असल्यामुळे राज्य शासनाने यावर्षी भीम जयंती महोत्सवावर निर्बंध लावले. दरवर्षी प्रमाणे मोठ्या प्रमाणात जयंती करता येणार नाही म्हणून महाराष्ट्रातील समविचारी बौद्ध उपासक-उपासिका यांनी बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय जयंती महोत्सव समिती च्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर धम्म प्रचार-प्रसारासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणांना राज्यस्तरीय युवा धम्मभूषण व धम्मकार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करुन, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी अभिवादन करण्यासाठी या हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या समितीने 1 ते 14 एप्रिल पर्यंत पुरस्कारासाठी महाराष्ट्रभरातून स्ताव माघवले होते त्या सर्व प्रस्तावाचा अभ्यास करुन, पडताळणी करुन समितीचे अध्यक्ष रामदास घेवंदे यांनी 16 एप्रिल रोजी पुरस्कार जाहिर केले. या संयोजन समिती मध्ये नांदेड चे संजय कदम, प्रणिता हनुमंते-हिंगोली, बाबाराव नाईकवाडे-नाशिक, दिपक भालेराव-मुंबई, बालाजी दांडगे, व धम्मपाल अडसूळ-पुणे, प्रकाश मगरे, गंगाधर मानवते, नंदकुमार खाडे, दिलिपराव खडसे, अनिल थोरात, गयाबाई कोकरे, विजयभाऊ मस्के, शिवाजी डोंगरे, ललितकुमार कांबळे इत्यादींनी या पुरसकार देण्याच्या प्रक्रियेत मेहनत घेतली.
सर्वां अभिनंदन
उत्तर द्याहटवापुरस्कार प्राप्त सर्वच मान्यवरांचे सहृदय हार्दिक हार्दिक अभिनंदन
उत्तर द्याहटवा💐🙏💐🙏💐
नारायण संभाजी घुले
तथागत नगर, नांदेड.