अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना २ लाख रुपयांचे अनुदान मिळणार

योजनेच्‍या अटी पुढील

अनुसूचित जातीतील दहावीच्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षात प्रत्येकी 1 लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

 उद्देश : अनुसूचित जातीतील तळागाळातील गरीब कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना आपले भविष्य घडवण्यासाठी संधी व मदत मिळावी असा उद्देश ठेऊन योजना राबविणार असल्याची ग्वाही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

 जबाबदारी :  या योजनेची पारदर्शक अमलबजावणी करण्‍याची जबाबदारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधव न प्रशिक्षण संस्‍था (बार्टी) यांची असणार आहे.

गरजूंसाठी फायदा : असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या, कमी पगारावर किंवा कंत्राटी स्वरूपात किंवा खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्‍यासाठी खालील अटींची पूर्तता करावी लागणार

१) परीक्षेत 90 टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे.

२) या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

३) विद्यार्थ्यांचे पालक शासकीय सेवेत नसावेत.

शासकीय नौकरीत असणा*या पालकांच्‍या पाल्‍यांना ही योजना लागू असणार

४) उत्पन्नाचा व जातीचा प्रमाणित दाखला देणे अनिवार्य राहील.

सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनस्तरावर आणखी गाईडलाईन्स जाहीर झाल्यानंतर सविस्तरपणे या योजनेची माहिती देण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

📺 Apli News YouTube

आपली न्यूजचे ताजे व्हिडिओ, बातम्या आणि अपडेट्स YouTube वर पाहा.

▶ YouTube Channel