बारसगाव ते रहाटी तेलंगाना सीमेपर्यंत जलद कामाची पावसाने खोल्ली पोल-खोल

 

बारसगाव ते रहाटी तेलंगाना सीमेपर्यंत जलद कामाची पावसाने खोल्ली पोल-खोल

 


पावसामुळे महामार्गावर  अनेक ठिकाणी पडले खड्डे विशेष प्रकल्प विभागाचे दुर्लक्ष

 

भोकर : गेल्या चार वर्षापासून प्रलंबित असलेल्या ५६ कि मी च्या बारसगाव ते रहाटी तेलंगाना सीमेपर्यंत च्या कामाचे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्तिगत लक्ष घालून सदरील काम पूर्ण करण्याच्या हेतूने व्यक्तिगत लक्ष घालून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी  यांच्याकडे विषय  मांडला  त्यानंतर पूर्वीच्या गुंत्तेदाराचे कंञाट रद्द करून सदरील काम निखिल कंट्रक्शनला सोपविण्यात आले होते निखिल कंट्रक्शन ने तुफान एक्स्प्रेस ने काम करत ना कामाच्या दर्जाकडे पाहिलं न काम किती दिवस टिकेल हे पाहिलं फक्त आणि फक्त लवकरात लवकर कामे उरकून बिले उचलून घेण्याच्या उद्देशाने दर्जाहीन कामे केल्याचे एका पावसातच सिद्ध झाल्याचे दिसून आले भोकरहून तेलंगणाकडे जाणाऱ्या  या महामार्गावरील पोमनाळा व सावरगाव जवळच्या एकाच पावसाने मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने निखिल कंट्रक्शन च्या बोगस कामाची  एकाच पावसात  पोलखोल  झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले

     भोकर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग रस्ता हा दक्षिण भारताला जोडणारा असल्याने शासनाने रस्ता सुधारण्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी देण्यात आला आहे मागील चार ते पाच वर्षांपासून तालुक्यातील रस्त्यांची अनेक वेळा कामे करण्यात आले पण आज पर्यंत कामाचा शेवट झाला नाही पावसाळ्यात वाहनधारक आणि नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत बारसगाव ते तेलंगणा सीमेपर्यंत 56 किलोमीटरचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे आहे विविध पक्ष संघटनांनी तक्रारी केल्या आंदोलन मोर्चे झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग कधी कारणे काही सुधारणा केली नाहीत प्रारंभी हे काम देण्यात आले होते त्यांच्या तर्फे रॉयल कंपनी काम सुरू केले मात्र काही काम करून काम अर्धवट स्थितीत सोडून दिले होते यानंतर पूर्वीच्या गुंत्तेदाराचे यांचे कंञाट रद्द करून नवीन कंत्राटदार निखिल कंट्रक्शन यांना काम देण्यात निखिल कंट्रक्शन ए घाईगडबडीत कामे पूर्ण करून हा रस्ता जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर असा सदरील कामाचा दर्जाही दर्जाहीन होत असल्याच्या चर्चा अनेकदा ऐकण्यास मिळाल्या परंतु एका अवकाळी पावसाने निखिल कंट्रक्शन हे बोगस काम करत आहे हे  पहिल्याच पावसाने सिध्द झाले. तसेच महामार्गावरील कामासाठी परत आंदोलन छेडण्याचा इशारा भिम टायगर सेनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष मिलिददादा गायकवाड व ऑल इंडिया पँथर सेनेचे भोकर तालुका अध्यक्ष निखीलदादा हंकारे यांनी दिला आहे.

 प्रतिक्रीया  चोकट

 गुत्तेदाराला कुणत्याही प्रकारची सूट न देता पुन्हा चांगल्या पद्धतीचे काम करून घेऊ बोगस आढळल्यास कारवाई करू 

-    एस के हटकर

सहायक अभियंता श्रेणी 1

उपविभाग भोकर

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने