दुचाकींच्या समोरासमोर धडकेत एकजण जागीच ठार; दोघे गंभीर जखमी

दुचाकींच्या समोरासमोर धडकेत एकजण जागीच ठार; दोघे गंभीर जखमी 

भोकर तालुक्यातील बटाळा ते दिवशी रस्त्यावरील कोळगाव शिवारातील घटना 


भोकर ( प्रतिनिधी ) दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना ता २१ बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील बटाळा ते दिवशी रस्त्यावरील कोळगाव शिवारात घडली आहे संभाजी अशोक ढगे असे मृताचे नाव आहे 

भोकर तालुक्यातील बटाळा ते दिवशी रस्त्यावरील कोळगाव शिवारात समोरुन येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली या जोरदार धडकेत संभाजी अशोक ढगे याच्या डोक्याला जबर मार लागून जागीच मृत्यू झाला. तर मेव्हूणा शकंर नरवाडे व दुसऱ्या दुचाकीवरील गजानन यलप्पा कुंटावाड वय ३० वर्ष रा.नांदा ता.भोकर हे दोघे गंभीर जखमी झाले.गंभीर जखमींवर येथील शासकिय  ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेडला रवाना करण्यात आले आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

📺 Apli News YouTube

आपली न्यूजचे ताजे व्हिडिओ, बातम्या आणि अपडेट्स YouTube वर पाहा.

▶ YouTube Channel