रेणापूर येथून जाणाऱ्या लेंडी नदीच्या पुलाच्या अर्धवट कामामुळे भोकर पासून दहा गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता

रेणापूर येथून जाणाऱ्या लेंडी नदीच्या पुलाच्या अर्धवट कामामुळे भोकर पासून दहा गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता


आपली न्युज 

सतीश भवरे भोकर प्रतिनिधी

       भोकर तालुक्यातील रेणापूर गावाकडे लेंडी नदीच्या पुलाचे काम बऱ्याच दिवसापासून चालू आहे. परंतु संबंधीत गुत्तेदार यांच्या हलगर्जीपणामुळे पुलाचे काम अर्धवट झाले आहे.सतत पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन रस्ता नसल्यामुळे रेणापूरसह इतर गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.

       भोकर पासून 5 ते 6 किलोमीटर वर असलेल्या रेणापूरकडे जाणारा रस्त्यामध्ये लेंढी नदी असून त्या ठिकाणी पुलाचे काम सुरू आहे. अर्धवट कामामुळे पर्यायी मुरूम टाकून रस्ता केला आहे. परंतु पुलाचे काम न झाल्यामुळे शेतकऱ्यांना तसेच या रस्त्याने ये-जा करणाऱ्या मजूर इतर गावकरी यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लोकांना तासन तास पूर उतरण्याची वाट पाहत बसावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे रेणापूर, कोळगाव (बु.) , कोळगाव (खु.), गारगोटवाडी (दि.), दिवशी (बु.) आदी गावातील लोकांना जाता-येता येत नाही. अपघात होण्याची शक्यता वाढली आहे तसेच पावसामुळे संपर्क तुटल्यामुळे सदर गावातील जनता मूलभूत सुविधांपासून वंचित राहील. त्यामुळे सदर पुलाचे काम लवकरात लवकर करून देण्यात यावे अशी मागणी जनतेतून होत आहे तसेच पुलाचे काम लवकरात लवकर न झाल्यास उपोषण व आंदोलन करण्याचे जनतेतून बोलले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने