कोरोना संसर्गाच्या काळात जमा केलेल्या दंडाची रक्कम निंभोरा, व विवरा ग्रा.प यांना पोलिस स्टेशनचे स.पो.नि.स्वप्निल उनवणे यांनी चेक द्वारे केली सुपुर्द

कोरोना संसर्गाच्या काळात जमा केलेल्या दंडाची रक्कम निंभोरा व विवरा ग्रा.प. यांना पोलिस स्टेशनचे स.पो.नि.स्वप्निल उनवणे यांनी चेक द्वारे केली सुपुर्द

   
सोबत फोटो :- दंडाच्या रकमेचा धनादेश स्विकारतांना सरपंच सचिन महाले प्रसंगी उपस्थित ग्रामविस्तार अधिकारी व ग्रा.प.सदस्य.....व स.पो.नी उनवणे व.उपनिरीक्षक शिंदे.आदी. उपस्थित होते


आपली न्युज वृत्तसेवा

05/08/2021

श्री.सागर चौधरी 

निंभोरा बु।।प्रतिनीधी ता.रावेर  

9403453595

       कोरोना संसर्गाच्या काळात मास्क न लावणे,सोशल डिस्टंन्सिंगचे उल्लंघन, विनाकारण फिरणे, अशा वेगवेगळ्या कारणांवरुन केलेल्या कारवाईत निंभोरा पोलिस स्टेशन स्टेशन तर्फे एक लाख अकरा हजार रु.दोनशे रु. एवढी रक्कम जमा झाली होती. ती रक्कम गावाच्या विकासासाठी निंभोरा बु.व विवरा बु. ग्रामपंचायतींना निंभोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक स्वप्निल उनवणे यांच्या शुभ हस्ते ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना चेक द्वारे रक्कम अदा करण्यात आली. 

       प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक आदेश पारित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील विविध ग्रामपंचायतीच्या गांव नमुना नं. 7. मधील सामान्य पावती पुस्तकांमधून ही दंडाची पावती दिली जात होती. यासाठी स.पो.नि.स्वप्निल उनवणे, उपनिरीक्षक योगेश शिंदे, राकेश वराडे, स्वप्निल पाटील, यांच्यासह सर्व पोलीस स्टाफ, होमगार्ड स्टाफ, यांच्या साहाय्याने निंभोरा बु.  ग्रामपंचायतच्या पावती पुस्तकात रु. 64700, विवरा बु. ग्रामपंचायतच्या पावती पुस्तकात रु. 46500. असा एकूण रु.1लाख 11हजार 200.रु. दंड वसुल करण्यात आला. यापैकी निम्मे ग्रामपंचायतीनां विकास कार्यासाठी, व निम्मे पन्नास टक्के रक्कम पोलीस वेलफेयर फंडात जमा केली. 

       निंभोरा ग्रामपंचायतीचा रु.32, हजार 350 रुपयांचा चेक निंभोरा ग्रामपंचायत सरपंच सचिन महाले, ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य   अमोल खाचणे, शेख दिलशाद, चंद्रकांत खाचणे, यांच्या कडे निंभोरा पोलीस स्टेशन तर्फे स.पो. नि. स्वप्निल उनवणे, उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी सुपूर्द केला.व दुसरा चेक विवरा बु. ग्रामपंचायत सरपंच युनूस तडवी, ग्रामविकास अधिकारी अरविंद कोलते यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला. हा निधी गावाच्या विकास कार्यासाठी, उपयोगात आणावा असे स्वप्निल उनवणे यांनी आवर्जून सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने