संविधान गौरव महोत्सवास हजारोच्या संख्येने सहभागी व्हा- भिमराव बुक्तरे

 संविधान गौरव महोत्सवास हजारोच्या संख्येने सहभागी व्हा- भिमराव बुक्तरे


 नांदेड :  ऑल इंडिया पँथर सेना नांदेड आयोजित संविधान दिन २६ नोव्हेंबर निमित्त संविधान गौरव महोत्सवास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहुन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष भिमराव बुक्तरे यांनी केले. 

     छत्रपती चौक,नांदेड  याठिकाणी दुपारी 12 वाजता संविधान गौरव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

         या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून  प्राचार्य डॉ.विकास कदम तर अध्यक्षस्थानी  तहसीलदार किरण अंबेकर यांची उपस्थिती  असणार आहेत तर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून युवा वक्ते राहुल पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.

 या कार्यक्रमात संविधानाची प्रत, व प्रस्ताविका चे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात येणार आहे असे भिमराव बुक्तरे यांनी सांगितले. पुढे बोलतांना ते म्हणाले की आज संविधनाविषयी जनजागृती करण्यात आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

📺 Apli News YouTube

आपली न्यूजचे ताजे व्हिडिओ, बातम्या आणि अपडेट्स YouTube वर पाहा.

▶ YouTube Channel