विलासभाऊ हटकर यांचा अपघात नसून खूनच

विलासभाऊ  हटकर यांचा अपघात नसून खूनच


      आरोपीवर तात्काळ भादवी. 302 व ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करून आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा भिम टायगर सेना भोकर तालुक्याच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर तीव्र आंदोलन करणार - दादासाहेब शेळके 

       समतानगर,भोकर जी नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते देवा भाऊ हटकर यांचे छोटे बंधू विलास भाऊ हटकर यांचा अपघात नसून खूनच ह्या संदर्भात पोलिस निरीक्षक भोकर यांना निवेदन देऊन लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा भिम टायगर सेना भोकरच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकर समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदन देताना भिमटायगर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके, राष्ट्रीय उपाध्यक्ष साहेबराव येरेकर, जिल्हाप्रमुख मिलिंददादा गायकवाड ,तालुका प्रमुख प्रतीकदादा कदम, हदगाव ता.प्र. जयकिंनभाऊ रावळे, भीमरावदादा हनवते,सचिनभाऊ राऊत, शेख माजिद शहराध्यक्ष विजय दवणे, फिरोज पठाण, आर के चिकाळकर आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने