ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपीला त्वरित अटकेसाठी भोकर तालुक्याचे वतीने निवेदन.

ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपीला त्वरित अटकेसाठी भोकर तालुक्याचे वतीने निवेदन.



आपली न्‍युज

सतिश भवरे तालुका प्रतिनिधी भोकर

दि. 02/08/2021


       ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा ऑल इंडिया पँथर सेना भोकरच्‍या  वतीने निषेध करून घडलेल्या घटनेचा तपास करून आरोपीला लवकरात लवकर अटक करा अन्यथा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तहसीलदार साहेब यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदनाव्‍दारे देण्‍यात आला.  यावेळी ऑल इंडिया पँथर  सेनेचे भोकर तालुका अध्यक्ष निखिल हंकारे, राजेश चंद्रे, भाऊराव कावळे, उपाध्यक्ष कुलदीप तोडे, दिलीप रायभोळ, बुद्धशिल तोडे,  सुरज डोंगरे, मारोती देवके, रोहन लोखंडे, शुभम गायकवाड आदी यावेळी  ऑल इंडिया पँथर सेनेचे  कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

📺 Apli News YouTube

आपली न्यूजचे ताजे व्हिडिओ, बातम्या आणि अपडेट्स YouTube वर पाहा.

▶ YouTube Channel