भोकर शहरात गूटख्याचा गोळ्या बिस्किटे च्या दुकाना आड सुळ सुळाट विक्री

 भोकर शहरात गूटख्याचा गोळ्या बिस्किटे च्या दुकाना आड सुळ सुळाट विक्री...



भोकर शहर मधील प्रकार


आपली नूज : सतीश भवरे

भोकर प्रतिनिधी 

       भोकर: महाराष्ट्र राज्य सरकारने २०१२ पासून गुटख्याची निर्मिती आणि विक्रीवर कायदेशीर बंदी घातली आहे. प्रत्यक्षात मात्र कायदा धाब्यावर बसवून गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची राजरोस विक्री सुरूच आहे. भोकर शहरात अन्न व औषध प्रशासनाने गेल्या वर्षभरात २० ठिकाणी छापे टाकून सहा हजार किलो गुटखा जप्त केला. तेलंगणातून छुप्या पद्धतीने गुटखा महाराष्ट्रात पोहोचतो, तर सीमाभागासह राज्यातही अनेक ठिकाणी गुटखा निर्मितीचे अवैध अड्डे सुरूच आहेत.गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांमध्ये असलेल्या मॅग्नेशियम कार्बोनेटसारख्या घातक घटकांमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा समाना करावा लागतो. तंबाखुजन्य पदार्थांमुळे नागरिकांचे आरोग्य बिघडू नये,यासाठी राज्य सरकारने २०१२ मध्ये गुटख्यासह तंबाखूजन्य सुपारी, पानमसाला याची निर्मिती आणि विक्री करण्यास बंदी घातली. या निर्णयाला सहा वर्षे उलटली, मात्र कायद्यातील पळवाटा आणि सरकारी यंत्रणांची नजर चुकवून गुटखा निर्मितीसह विक्रीही सुरूच आहे.अवैध गुटखा विक्रीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रश्न उपस्थित होता. आहे राज्यात गुटखा बंदी असतानाही गुटख्याची राजरोस विक्री सुरूच कशी राहते? हा गुटखा विक्रेत्यांपर्यंत पोहोचवणारी मोठी यंत्रणा कार्यरत आहे.कोट्यवधी रुपयांचा गुटखा रोज विक्रेत्यांपर्यंत पोहोचतो आणि त्याची विक्रीही होते. दुकानांमध्ये माळा लटकवून विक्री होत नसली तरी छुपी विक्री कमी नाही. रस्त्यांवर पडणाऱ्या रिकाम्या पुड्यांवरून याचा अंदाज येतो. गुटख्याला पर्याय म्हणून मावा खाल्ला जातो.माव्यातही तंबाखूचा वापर होत असल्याने तो तयार करणे आणि त्याची विक्री करणे बेकायदेशीर आहे. याकडे दुर्लक्ष करून सर्रास पान टपऱ्यांमध्ये मावा तयार करून विकला जातो. तरुणाईला माव्याचे व्यसन जडल्यामुळे पान टपऱ्यांवर नेहमीच गर्दी दिसते.भोकर येथे मेन चौक.उडाण.पुलाच्या.बाजुला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक.व अनेक पान टप्परी व दुकानात होलसेल गुटखा विक्रीचे केंद्र आहेत. मोठे वितरक या परिसरात कार्यरत आहेत.अन्न व औषध प्रशासनाने गुटखा पकडल्यानंतर वितरकांसह निर्मिती करणाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे धाडस दाखवण्याची गरज आहे.अवैध गुटखा विक्रीवर कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांनाही आहेत. गुटखा निर्मिती, तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी संशयास्पद वाहनांची नियमित तपासणी करणे,गुटखा विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचे काम सातत्याने सुरू राहिल्यास गुटखा विक्रेत्यांना आळा बसू शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

📺 Apli News YouTube

आपली न्यूजचे ताजे व्हिडिओ, बातम्या आणि अपडेट्स YouTube वर पाहा.

▶ YouTube Channel