भोकर :मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष ना अशोकराव चव्हाण यांना मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्यास छावाचा आंदोलनाचा ईशारा.
आपली नूज : सतीश भवरे
दि. 22/ 11/2021
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण भोकर येथे उड्डाणपुलाचे उद्घाटन प्रसंगी आले असता अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शंकर पाटील बोरगावकर यांच्या नेतृत्वात निवेदन दिले असून त्या निवेदनात मराठा आरक्षण केंद्राची जबाबदारी की राज्याची जबाबदारी स्पष्ट करून आरक्षणाचा निर्णय मार्गी लावा मराठा आरक्षणाच केवळ राजकारण होत आहे हे समाजाच्या निदर्शनास येत आहे केंद्र सरकार राज्य सरकारची जबाबदारी आहे असे म्हणतो राज्य सरकार केंद्र सरकारची जबाबदारी आहे असे म्हणतो नेमकी केंद्राची कोणती जबाबदारी आहे राज्याची कोणती जबाबदारी आहे व सुप्रीम कोर्टाचा काय म्हणणं आहे आपण मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असल्यामुळे याचे स्पष्टीकरण देऊन सत्ताधारी व विरोधक एकत्र येऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा मराठ्यांचे आधारस्तंभ माननीय नानासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरून आंदोलन करनार असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर तालुका अध्यक्ष परमेश्वर सावळे, तालुका संपर्क प्रमुख अनिल भोसले, संदीप येलुरे, सुनिल पवार , बाळू कदम , अनिल जाधव , शरद पवार , दत्ता लोणे, प्रशांत पाटील, दशरथ कदम, जितेंद्र सावंत, गंगाधर जाधव, भगवान जाधव, शिवा माने यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षर्या आहेत.