रावणगांव येथील भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखेची कार्यकारिणी जाहीर

रावणगांव येथील भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखेची कार्यकारिणी जाहीर


आपली नूज : सतीश भवरे

भोकर (नांदेड )

दि.25/12/2021


दि. 23 नोव्हेंबर 2021रोजी "भारतीय बौद्ध महासभा" भोकर तालुका शाखा अध्यक्ष पी.एम. तोडे सर यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली यावेळी तालुका सरचिटणीस बाबुराव सोनकांबळे, तालुका कोषाध्यक्ष प्रसाद शहाणे , जिल्हा संस्कार सचिव आप्प्पाराव येरेकार यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली. 

     सर्व प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व प.पू डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.व त्यानंतर रावणगांव येथील भारतीय बौद्ध महासभेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.भारतीय बौद्ध महासभेच्या ग्राम शाखा अध्यक्षपदी उपा. बाबूराव विठ्ठलराव जंगमे तर सरचिटणीस पदी अमृतराव संघाजी कदम  व अमोल अशोक चंद्रे यांची कोषाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.व या ग्राम शाखेत आयु. कचरु खोब्राजी कदम , धम्मानंद नारायण कांबळे , दिगांबर रानबाजी चंद्रे, धम्मदीप बाबुराव चातेकर, राहूल विठ्ठलराव चंद्रे, विमलबाई राहूल चंद्रे , रोहीत विलासराव कदम, इश्वराबाई गंगाधर कदम, विशाखा संदिप जंगमे, राजरतन गंगाधर कदम, बंडू ग्यानोबा चंद्रे , दयानंद पांडूरंग चंद्रे यांची भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा रावणगांव कार्यकारिणीत निवड करण्यात आली.

सुत्रसंचलन उपा. अमृतराव संघाजी कदम तर आभार उपा. अमोल अशोक चंद्रे यांनी मानले यावेळी श्रद्धावान उपासक उपासिका बालक बालिका बहुसंख्येने उपस्थित होते सर्वांनी मिळून नवीन कार्यकारिणीस धम्मकार्यास शुभेच्छा दिल्या . आणि शेवटी सरणतय गाथा घेवून कार्यक्रम संपवण्यात आला .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

📺 Apli News YouTube

आपली न्यूजचे ताजे व्हिडिओ, बातम्या आणि अपडेट्स YouTube वर पाहा.

▶ YouTube Channel