भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा भोकर कार्यकारिणीची पुनर्नियुक्ती बाबत 25 सप्टेंबर 2022 रोजी बैठक.

भोकर : सतीश भवरे

भोकर ( नांदेड )

दिनांक : 20/09/2022

-- - - - - - - - = - - = - - - = - - - 

       भोकर तालुक्यातील सर्व  बौद्ध उपासक व उपासिका तसेच भारतीय बौद्ध महासभेचे आजी माजी पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, बौध्दाचार्य, समता सैनिक दलातील सर्व सैनिक, वार्ड शाखेचे तसेच ग्राम शाखेचे सर्व पदाधिकारी यांना कळविण्यात येते की, भारतीय बौद्ध महासभा शाखा भोकर येथे तालुका कार्यकारिणीची पुनर्नियुक्ती ( पूर्नगठित ) बैठक दिनांक 25/9/2022 रोज रविवारी सकाळी 11 : 00 वाजता पंचशील बुद्ध विहार, प्रफुल्ल नगर भोकर येथे आयोजित केली आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून तालुक्यातील अधिक धम्ममय वातावरण तयार करण्यासाठी तालुका कार्यकारिणीत निःस्वार्थी, समाजासाठी वेळ देणारे, प्रामाणिक, निर्वेसनी, आंबेडकर घराण्याशी निष्टा बाळगणारे अश्या धम्मबांधवाला या कार्यकारिणीत असण्याची अत्यंत आवश्यकता आहे,  नव्हे तर आपली तेवढीच जबाबदारी आहे.

       करीता वेळेत उपस्थित राहून धम्मचळवळ गतिमान करावी आणि आपल्या धम्मासाठी धोक्याची घंटा वाजते की काय ?ही भीती निर्माण झाली आहे. त्यासाठी आपण सर्वांनी तन - मन - धनाने सज्ज राहाल अशी अपेक्षा करतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

📺 Apli News YouTube

आपली न्यूजचे ताजे व्हिडिओ, बातम्या आणि अपडेट्स YouTube वर पाहा.

▶ YouTube Channel