दिल्लीमध्ये सत्तेत असणाऱ्या लोकांनी कामगारांच्या आयुष्या चं वाटोळं केलं_सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी.एल.कराड


आपली न्यूज : सतीश भवरे 

भोकर (तालुका प्रतिनिधी)


     1990 नंतर दिल्लीमध्ये सत्तेवर असलेल्या सरकारने कामगारांचा घात केला, देशातील एक कोटी कामगारांना कायम केलं नाही, श्रीमंत उद्योग पतींचे कर्ज माफ केले, कामगारावर अन्याय केला, कामगारांच्या आयुष्याचं वाटोळं केलं असे परखड मत सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ.डॉ.डी. एल. कराड यांनी भोकर येथे बोलताना व्यक्त केले.

       सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स( सिटू) चे ७ वे नांदेड जिल्हा अधिवेशन भोकर येथे पार पडले. यावेळीप्रमुख वक्ते सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ.डॉ.डी.एल.कराड हे होते, प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र सीटूचे कोषाध्यक्ष काँ.के.आर.रघु, महाराष्ट्र सचिव कॉ.अण्णा सावंत, किसान सभेचे राज्य कार्याध्यक्ष कॉ.अर्जुन आडे, जनवादीचे कॉ.शंकर सीडाम, स्वागताध्यक्ष मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बी.आर.पांचाळ, उद्घाटक कॉ.विजय गाभणे,अध्यक्ष राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार आदींची उपस्थिती होती. जि प केंद्रीय नूतन शाळा भोकर येथे घेण्यात आलेल्या सभेत पुढे बोलताना कॉ. डॉ.डी.एल.कराड म्हणाले कामगारांसाठी, मेहनत करणाऱ्यांसाठी न्याय मिळावा म्हणून कामगार चळवळी चालल्या पाहिजे, सत्तेमधून पैसा कमवतात मात्र कष्टकऱ्यांसाठी कुणी काम करत नाही, आजकालची हुशार मुलं चळवळीत यायला तयार नाहीत, समाजाबद्दल आस्था आजच्या पिढीमध्ये दिसत नाही, सत्तेसाठी लोक मागे लागले आहेत, समाजसेवेचा आव आणणारी मंडळी आपली संपत्ती वाढवत आहेत, शेतकरी कामगारांसाठी कुणी काम करताना दिसत नाही, शेतकरी कामगारांचे प्रश्न तीव्र झाले आहेत, सरकार श्रीमंत लोक, ठेकेदार, उद्योगपती यांना मोठे करीत आहे देशात १ कोटी योजना कर्मचारी काम करतात त्यांना स्वयंसेवक म्हणून संबोधल्या जाते राजकीय लोक सुद्धा स्वयंसेवक आहेत त्यांना पगार कशासाठी? योजना कर्मचाऱ्यांना मानधन दिले जाते हा सरकारचा डाव ओळखावा, सरकारने नोकर भरती बंद केली आहे, ज्यांना दिल्लीमध्ये निवडून दिलं त्यांनी गद्दारी केली, कामगारांना कायम होण्याचा अधिकार काढून टाकला, अदानी, अंबानीं, टाटा, बिर्ला, यांचं १० लाख कोटींचं कर्ज माफ केलं, दुसरे ५ लाख कोटी माफ केले, गरिबाकडून टॅक्स वसूल करून मोठ्या प्रमाणात किमती वाढवल्या, भांडवलदारांची दलाली करणारे सरकार आहे, दलित सवर्णांमध्ये भांडणे लावली जातात, शिक्षण सुद्धा महाग झालंय, गरिबांचं शिक्षण नाही किमान वेतन कायदा झाला पाहिजे, आठ तास काम करणाऱ्या कामगारांना 26 हजार पगार मिळाला पाहिजे, निर्णायक शक्ती तयार करा, एकजुटीची ताकद निर्माण करावी, सीटू सारख्या संघटनेत सहभागी होऊन लढा द्यावा,कामगार जोपर्यंत जागा होणार नाही तोपर्यंत हे होतच जाणार म्हणून संघटित व्हा एकजूट होऊन काम करूया असेही शेवटी कॉ. कराड म्हणाले. प्रास्ताविक कॉम्रेड दिलीप पोत्रे यांनी केले, स्वागताध्यक्ष पत्रकार बी.आर.पांचाळ,कॉ. उज्वला पडळकर, कॉ. विजय गाभणे यांनीही यावेळी कामगार चळवळी बाबत मनोगत व्यक्त केले, कॉ. पी. एन. राजापूरकर, सुलोचना ढोले यांच्यासह जिल्ह्यातील अंगणवाडी शिक्षिका, आशा वर्कर, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कामगार, बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते,सूत्रसंचालन कॉ. शिवाजी गायकवाड यांनी केले तर आभार कॉ. अनिल कराळे यांनी मानले छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत भव्य कामगारांची रॅली करण्यात आली त्यानंतर अधिवेशनही पार पडले.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने