श्रीराम वागदकर यांची राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या जिल्हा अध्यक्ष (अनुसूचित जमाती ) पदी निवड

 


भोकर ( प्रतिनिधी )

 भोकर येथील सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी समाजाला न्याय मिळवून देणासाठी अहोरात्र परिश्रम घेवून आदिवासी समाजात आपली छाप पाडून ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याचा आढावा घेवून जिल्हा अध्यक्ष इजि. विश्वभंर पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी  पार्टी अजित पवार गटाच्या जिल्हा अध्यक्ष अनुसुचित जमाती या पदावर श्रीराम वागदकर यांची निवड झाली.

          सामाजिक कार्याची मुळातच आवड असल्या कारणाने शैक्षणिक काळापासून विद्यार्थ्याच्या अडीअडचणी सोडविण्यापासून त्यांच्या कार्याला सुरुवात झाली . अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भोकर पासून ते आझाद मैदान मुंबई पर्यंत आंदोलन व उपोषण केले. अनेक सामाजिक कार्यात त्यांनी सहभाग नोंदविला. २००८ व २०१७ भोसी सर्कलमधून जिल्हा परिषद निवडणूक लढवून दुसऱ्या क्रमांकावर राहिले. आदिवासी समाजाचे नेतृत्व करण्यासाठी आदिवासी समाजानेच त्यांना निवडणूकीच्या रिंगणात उभे केले. त्यांच्या पाठीशी अहोरात्र परिश्रम करून खंबीरपणे उभा राहणारा एकमेव नेता म्हणजेच श्रीराम वागदकर अशी त्यांची ओळख संपूर्ण नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे.

            अशा आदिवासी समाजाच्या लढवय्या नेत्याची दखल घेवून राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीने अनुसुचित जमाती जिल्हा अध्यक्ष या पदावर निवड केली असून यांचा राष्ट्रवादी पार्टीला फार मोठा फायदा होणार आहे. यांच्या निवडीबद्दल जिल्हा अध्यक्ष इजि. विश्वभंर पवार, नामदेव वाघमारे, संजय सिडाम, डॉ. कैलास कानिंदे, अहेमद करखेलीकर, रामराव वागदकर, विनोद कांबळे, संजय राठोड, प्रमोद चौदंते व अनेक सामाजिक कार्यकर्ते व पार्टीचे पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले .



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने