आपली न्यूज : सतीश भवरे
भोकर (नांदेड )
दिनांक :२६/०९/२०२२
बौध्दांची मातृसंस्था असलेली भारतीय बौद्ध महासभा या सभेच्या भोकर तालुकाध्यक्ष पदी आयु.बी.पी.सोनकांबळे तर सरचिटणीस प्रसाद शहाणे आणि कोषाध्यक्ष पदी आयु. गोविंद गायकवाड चिदगीरीकर यांची निवड करण्यात आली.या कार्यकारिणीच्या निवडीसाठी भारतीय बौद्ध महासभा नांदेड (उत्तर)चे सन्मानिय जिल्हा सरचिटणीस आयु. रविकिरण जोंधळे सर, हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रथम तथागत भ. बुध्द व पं.पुज्य डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन सन्मानिय अध्यक्ष व प्रमूख पाहुण्यांच्या हस्ते करुन सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले.भारतीय बौध्द महासभेचे माजी तालुकाध्यक्ष आद. का. पी.एम.तोडे सर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.तद्नंतर बैठकीस सुरूवात झाली.आयु.बी.पी.सोनकांबळे सरांनी मागील वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या उल्लेखनीय कामाचा व्रतांत व तोडे सरांच्या काळातील उर्वर्रीत कामाचा अपुरी कामे या विषयावर थोडक्यात माहिती करून काही मुद्दे सर्वासमोर मांडले.
या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा नांदेड( उत्तर )चे संस्कार उपाध्यक्ष आयु. ए.एस.जाधव सर, संस्कार सचिव आयु. सुभाष नरवाडे सर, आयु. प्रा. आप्पाराव येरेकार, का. सचिव सुरेश लोकडे, व केंद्रीय शिक्षक आयु. युवराज मोरे सर उपस्थित होते. केंद्रीय शिक्षक आयु. मोरे सरांनी भारतीय बौद्ध महासभेचे ध्येय धोरण, कार्यप्रणाली व आचारसंहिता या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.आयु.लोकडे सरांनी इच्छुक पदाधिकारी याची नावे घेऊन आलेल्या नावातून प्रमुख पाहुण्यानी 21पदाधिकार्याची भोकर तालुका कार्यकारिणीत निवड केली. त्यामध्ये बी.पी.सोनकांबळे अध्यक्ष,प्रसाद शहाणे सरचिटणीस, गोविंद गायकवाड चिदगीरीकर कोषाध्यक्ष तर किशोर सोनुला, सि. एम. कदम, साधना रावळे, अश्विनी भवरे, राजु दांडगे, अम्रता कदम,अशोक कदम, ग्यानु चव्हाण,संजय गुंडेराव, लक्ष्मीबाई डोंगरे,भिमराव तारु, सत्यपाल कदम, उत्तमराव एडके, आर. के. कदम, मुकूंदराव लव्हाळे, माधवराव लोखंडे,संघपाल पाटील, आनंदराव कदम यांची निवड करण्यात आली़.यावेळी भोकर तालुक्यातील अनेक मान्यवर, बौध्द उपासक मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे ता.अध्यक्ष आयु. सुनिल कांबळे, सरचिटणीस सुमेश फुगले,वंचितचे तालुकाउपाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष.बी.एस. सरोदे सर,सामाजिक कार्यकर्ते श्रीधर घुले, उमाकांत एडके,विरपिता गणपतराव गोवंदे,डि.एस.गायकवाड,बळीराम कदम, गंगाधरराव एडके,सुभाष तेले, आनंदराव गायकवाड,एस. आर. जोंधळे सर, रमेश रावळे, जे.डी वाघमारे सर, व इतर अनेक बौध्द बांधव मोठ्या प्रमाणात संख्येने उपस्थित होते. शेवठी किशोर सोनुले यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून सरणतय गाथे नंतर बैठक समाप्त करण्यात आली.