राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग नांदेड उत्तर च्या जिल्हा अध्यक्ष पदी युवा नेतृत्व प्रतीक कदम यांची निवड.
तरुण नेतृत्वाला संधी मिळाल्याने युवकाची फळी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत.
भोकर ( नांदेड )
भोकर तालुक्यातील युवा नेतृत्व, युवकांची बुलंद तोफ असणारी व्यक्ती प्रतीक कदम यांची सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या नांदेड उत्तर जिल्हा अध्यक्ष पदी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे यांनी नियुक्ती केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष विश्वाम्बर पवार यांच्या नेतृवाखाली काम करीत असताना एका तरुण, तडफदार कार्यकर्त्याला त्यांच्या कामाची एक पावतीच मिळाली आहे. या निवडीमुळे तरुण वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र अभिनंदन होत आहे. निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बळ मिळेल असे तरुण वर्गात चर्चा होत आहे.