भोकर नंदिनगर येथील अंगणवाडी खाऊ वाटपामध्ये मृत पाल. भीतीने त्वरित शासकीय रुग्णालय मध्ये मुलांना दाखल. प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार राजेश लांडगे यांनी दिली भेट.



आपली न्युज 

भोकर (प्रतिनिधी )

दिनांक : 04/11/2022


         भोकर शहरातील नंदिनगर भागातील अंगणवाडी येथील जनता अतिशय गरीब असून मजूरदार वर्ग आहे. या अंगणवाडी मध्ये लहान मुलांना जो खाऊ दिला जातो. या खाऊमध्ये मृत असलेली पाल आढळून आली आहे. सदर वाटाणा खाऊ मुलांना वाटप करण्यात आला आहे. खाल्यावर मुलांना काही प्रमाणात उलटी व मळमळ होत होते. त्यामुळे पालक व आई वडील यांच्या मध्ये घबरहाट झाली. त्यामुळे मुलांना भीतीने ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दाखल करण्यात आले.मुलांना त्वरित तपासणी करण्यात आली असून मुलाची तब्येत बरी असून उपचार करण्यात कर्मचारी यांनी चांगले प्रयत्न केले.यावेळी प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार भोकर यांनी भेट देऊन मुलांची, पालक भेट घेऊन विचारपूस करून डॉक्टर यांच्याशी चर्चा केली.यावेळी मोठया प्रमाणात पाहण्यासाठी गर्दी करण्यात आली.संबंधित अधीकारी नांदेड यांना मोबाईल वरून संपर्क साधला असता त्वरित कडक कार्यवाही व चौकशी करण्यात येईल असे सांगितले.प्रशासन काय भूमिका घेऊन कार्यवाही करेल. याकडे सर्वांचे लक्ष आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

📺 Apli News YouTube

आपली न्यूजचे ताजे व्हिडिओ, बातम्या आणि अपडेट्स YouTube वर पाहा.

▶ YouTube Channel