आपली नूज : प्रतिनिधी
भोकर (नांदेड )
दिनांक : 23/11/2022
भोकर तालुक्यातील मौ. सोनारी ता. भोकर येथे व परिसरात अवैध दारू विक्री अवैधरित्या जोमाने सुरु असून त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर येत आहेत व कुटुंबातील वाद वाढत आहेत. त्यामुळे मुलांच्या भवितव्य बिघडत आहेत. त्यामुळे अवैध विक्री होणारी दारू त्वरित बंद करावी. अश्या आशयाचे निवेदन सोनारी येथील सरपंच बालाजी आकुलवाड व ग्रामस्थ महिलांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.
सदर अवैध विक्री होणारी दारू त्वरित बंद करावी व योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा यापुढे नाईलाजास्तव लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येईल. असा इशारा येथील सरपंच बालाजी आकुलवाड व ग्रामस्थ महिलांनी दिला आहे.यावर प्रशासन काय कार्यवाही करेल. हा पुढील येणारा काळच ठरवेल.