सविस्तर
वृत्त असे की लहूजी शक्ती सेना हदगांव तालुका पदाधिकारी यांनी दिनांक १३/१२/२०२२ रोजी वेळ १२.३०
वाजताच्या दरम्यान पदाधिकारी यांची नावे के.डी.पवार रा.भानेगांव ता.हृदगांव राजू गायकवाड रा.हदगांव ता.
हदगांव, कैलास तलवारे
रा.कोथळा ता.हदगाँव व इतर पाच पदाधिकारी कार्यकर्ते गेले असता तामसा
पोलीस ठाण्याचे अधिकारी
मुंजाजी दळवी हे ठाण्यात हजर नसल्याने के डी पवार यांनी राजू गायकवाड यांच्या मोबाईलवरून दळवी
यांना फोन केला असता मी बाहेर आहे. १५ ते २० मीनीट येण्यासाठी लागतील काय काम
आहे अशी विचारना केली त्यावर के.डी.पवार मनाले की दिनांक १२/१२/२०२२ रोजी पांगरी (ता.) येथील
घटनेच्या संदर्भामध्ये आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहीता या प्रमाणे कलम दाखल करायला पाहीजें
होती परंतु आपले पोलीस ठाणे यांनी दाखल केली नाही असे सांगीतले असता. मुंजाजी दळवी
हे म्हणाले की ठिक
आहे. ठाण्यात आल्याने बोलूत थांबा तिथे लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी त्यानंतर
१.३० वाजताच्या दरम्यान
थांबले होते त्याच दरम्यान अधिकारी आले तुम्ही एवढे जन का थांबले मला
तु माझ्या मोबाईल नंबर
वर का फोन केला असे बोलत व शिवीगाळ करत हातापायी करून कर्मचाऱ्यांना सांगितले मधामध्ये घ्या
यांना यांच्यावर कार्यवाही करा कोणती लहूजी शक्ती सेना आणि कोण तुम्ही कार्यकर्ते
असे म्हणत अश्लील शिवीगाळ करत लहुजी शक्ती सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची दमदाटी
करत हातात चामडयाचा पट्टा ( सुंदरी ) घेऊन अंगावर धाऊन येऊन पदाधिकारी यांना आरोपी सारखी वागणूक
दिली आहे व दोन तास डांबून ठेवण्यात आले होते. त्यानंतर पदाधिकारी यांनी
संघटनेच्या नांदेड व औरंगाबाद च्या वरीष्ठ पदाधिकाऱ्यांना कळविले असता त्यांनी
मुंजाजी दळवी यांना मोबाईल वरून बोलले असता काही वेळांनी दळवी हे पदाधिकारी यांना
डांबून ठेवलेल्या ठिकाणी येऊन शिवीगाळ करत असे म्हणले की पोलीस ठाण्यामध्ये घडलेला
प्रकार बाहेर जाऊन वरीष्ठांकडे किंवा कोणालाही तुम्ही जर सांगीतल्यास तुमच्यावर
कलम ३५३ चे खोटे
गुन्हे दाखल करतो अशी धमकी दिली व लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकारी यांची सुटका
करण्यात आली. तामसा पोलीस ठाणे येथे पदावर नियुक्त झाले तेव्हा पासून किरकोळ वाद
असतील किंवा समाजा
विषय वाद असतील तेव्हा त्या त्या वेळस समाजातील लोक व कार्यकर्ते बोलावल्या नंतर
ज्या ज्या
वेळस आम्ही संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पोलीस ठाणे तामसा येथे
अपमानास्पद व नीच्च समजून
वागणूक देणाऱ्या अशा अधिकाऱ्यावर तात्काळ कार्यवाही करून निलंबीत करण्यात यावे.
अन्यथा लहूजी शक्ती सेना हदगांव तालुक्याच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र अंदोलन करण्यात येईल अशाप्रकारचे निवेदन हदगाव तहसीलदार , हदगाव पोलीस स्टेशन ,जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड , हदगाव लहुजी शक्ती सेनेच्या वतीने देण्यात आले.