भोकर : बाजार समितीचे सभापती व सचिव
यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून 10
विद्यमान सदस्यांनी टाकला सभेवर बहिष्कार-
संचालकाचे
आरोप बिनबुडाचे- सचिव पुजेकर
---------------------------------------------------
बाजार समितीचे सभापती व सचिव यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून 10 विद्यमान सदस्यांनी टाकला सभेवर बहिष्कार
भोकर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि सचिव यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून दिनांक 10 जून रोजी च्या होणाऱ्या मासिक सभेवर बहिष्कार टाकत असल्याचे पत्र विद्यमान उपसभापतीसह नऊ सदस्यांनी जिल्हा उपनिबंधक यांना देऊन नाराजी व्यक्त केली आहे. उपनिबंधक व बाजार समितीचे सचिव यांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, आज होणाऱ्या मासिक बैठकीत जे विषय आम्हाला मान्य नाहीत असे विषय टाकून सभेची नोटीस काढण्यात आली होती. त्याच प्रमाणे नवीन इमारतीमधील फर्निचर, इलेक्ट्रिक साहित्य व लिफ्ट हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे वापरले आहे. हे साहित्य वापरत असताना कोणत्याच संचालकांना विश्वासात घेतले नाही. तसेच सदरील काम जवळच्या गुत्तेदारास देऊन आपले हित साध्य करण्याचे काम सभापती व सचिव यांनी केल्यामुळे आज होणाऱ्या बैठकीवर सामूहिक बहिष्कार टाकत असल्याचे पत्रामध्ये नमूद केले असून निवेदनावर विद्यमान उपसभापती गणेश राठोड, सतीश देशमुख, विजयमला देवतूळे, अप्पाराव राठोड, ललिताबाई कदम, अनुसयाबाई बुदेवाड, पंकज पोकलवार, धोंडीबा भिसे, गणेश कापसे, राजकुमार अंगरवार, यांच्या सह्या आहेत.