19 जून 1950 रोजी औरंगाबाद येथील
"मिलिंद महाविद्यालय" स्थापना दिनानिमित्त...!
मिलिंद हा एक ग्रीक होता. त्याने
आपल्या विद्वत्तेबद्दल घमेंड होती की, ग्रीकांसारखे
विद्वान जगाच्या पाठीवर कोठेही सापडावयाचे नाही.त्याने जगाला आव्हानही दिले होते.
त्याला एकदा वाटले की आपण एखाद्या बौद्ध भिक्खुबरोबर वाद करावा. पण त्याच्याबरोबर
वाद करण्यास कोणीही तयार झाला नाही. मिलिंद हा एक क्षुल्लकसा मनुष्य होता. तो काही
तत्वज्ञानी किंवा जाडा विद्वानही नव्हता. त्याला राज्यकारभार कसा चालवावा हेच
माहीत होते. महाप्रयासाने "नागसेन" भिक्खु ला तयार केले गेले. मिलिंदाच
चॅलेंज आपण स्वीकारलं पाहिजे,असा
त्याने निश्चय केला,मग त्यात यश येवो की अपयश येवो.
नागसेन हा ब्राम्हण होता. वयाच्या 7व्या वर्षी त्यानं आपलं घर सोडले होते.
अशा या नागसेनाने भिक्खु लोकांचा आग्रह मान्य केला. नंतर मिलिंद व नागसेन यांचा
वादविवाद होऊन मिलिंदाचा पराजय झाला. त्या वादविवादाच एक पुस्तक पाली भाषेत 'मिलिंद पन्ह' या नावाने प्रसिद्ध झाले. या पुस्तकाचे
मराठीत भाषांतर 'मिलिंद प्रश्न' असा आहे. या पुस्तकाचे शिक्षकांनी व
विद्यार्थ्यांनी अवश्य वाचन करावे अशी माझी इच्छा आहे. त्यात शिक्षकांच्या अंगी
कोणते गुण असावेत हे दिलेले आहे. म्हणून मी व माझ्या सोसायटीने ह्या कॉलेजला
मिलिंद महाविद्यालय हे नाव दिल व जागेला 'नागसेन
वन' अस नाव दिल. मिलिंद वादविवादात हरला व
तो बौद्ध झाला, म्हणून मी हे नाव दिलेलं नाही. मी जे
ह्या कॉलेजला नाव दिलेले आहे ते आदर्शभूत असंच आहे, अस माझं मत आहे.
बौद्धधर्माशी संलग्न झालेले 'मिलिंद' हे नाव महाविद्यालयास देण्याचे दुसरे कारण असे की, विद्या ही अन्नासारखी सर्व मनुष्यास
आवश्यक आहे. प्रत्येकाला तिचा लाभ झाला पाहिजे. हा उदार विचार पहिल्यांदा भगवान
बुद्धांनीच उदघोषित केला असेल. तेव्हा असंख्य लोकांना कैक शतके अज्ञानात दडपून
ठेवण्यात आले त्यांना सुविद्य बनविण्याचा प्रारंभ करताना बुद्धाचे अथवा त्याच्या
शिष्याचे नाव आठवावे हे स्वाभाविकच आहे.
- आधुनिक बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर
संदर्भ :- खंड -18 भाग - 3 ,पान नं - 456,457