पोलिस स्टेशन भोकर येथे
नोंदवीलेला गुन्हा नं. 0232/2021 मध्ये कलम 306,506 भा.द.वि.गुन्हा नोंद मध्ये अॅट्रासीटी कलमाची नोंद करणे बाबत उपविभागीय पोलिस अधिकारी भोकर यांना निवेदन
भारतीय आदिवासी कोळी
सेना व अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक व विकास संघटना पुणे यांची मागणी
आपली न्युज
दिनांक 07 जुलै 2021
सतिश भवरे
मौजे बेंबर ता.भोकर येथील मयत युवक गंगाधर
रेडेवाड यांना आत्महत्येस कारणीभुत असलेल्या आरोपी दिगांबर नागोराव बट्टेवाड
रा.बेंबर ता.भोकर यांच्या विरोधात भोकर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नं.0232/2021 मध्ये
कलम 306 , 506 भा.द.वि.प्रमाणे गुन्हा नोंदविला असुन मयत यांच्या अंगावर दोन
वेळेस ट्रॅक्टर घालुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला असुन तशा धमक्याही देत होता
असे निवेदनात नमुद केले असुन ते कोळी महादेव या जमातीचे असुन कोळी महादेव जमातीचे
प्रमाणपत्र आहे. त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
करावा.
सदर बाबत
निवेदन भारतीय आविासी कोळी सेना व अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक व
विकास संघटना पुणे या संघटनेने निवेदन देऊन मागणी केली आहे. या निवेदनावर विजय पा.
मोरे भारतीय आदिवासी कोळी सेना राष्ट्रीय उपाध्यक्ष, गोविंद राऊतवाड , बाबुराव
आरकेलवाड, लक्ष्मण रेडेवाड , कैलास जंगेवाड, नामदेव चंचलवाड, संभाजी चिटेबोईनवाड,
रामेश्वर राऊतवाड रा. सर्व बेंबर , साईनाथ मानेबोईनवाड नांदा प.म्है. , दिगांबर
चिंतलवाड, राजेश गुंडेवार, संदिप करडेवाड आदिंच्या निवेदनावर स्वाक्ष-या आहेत.