वंचित बहुजन आघाडी चे नेते नामदेव आयलवाड यांचा वाढदिवस व सत्कार संपन्न.

 वंचित बहुजन आघाडी चे नेते  नामदेव आयलवाड यांचा वाढदिवस व सत्कार संपन्न.



आपली न्यूज

सतीश भवरे ( भोकर तालुका प्रतिनिधी )

      वंचित बहुजन आघाडी चे नेते व गोल्ला - गोल्लेवार समाज संघटनेचे प्रदेश अध्यक्ष नामदेव आयलवड यांचा वाढदिवस आज दि. 07 जुलै 2021 रोजी संगम फंक्शन हाल भोकर येथे साधेपणाने व अतिशय उत्साह पूर्ण साजरा करण्यात आला.

     या वाढदिवस कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी चे दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले हे होते. यावेळी सर्वप्रथम सत्कार करून त्यांना सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शुभेच्छुक मनोगत व्यक्त करण्यात आले. यामध्ये एल. ए. हिरे जेष्ठ पत्रकार तथा समाज भूषण यांनी तालुक्याचा इतिहास सांगून नामदेव आयलवाड यांचे कार्य सांगितले. वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष डाँ. वाठोरे, तालुका भोकर चे अध्यक्ष सुनील कांबळे, ओबीसी नेते नागोराव शेंडगे यांनीही मनोगत मांडून नामदेव आयलवाड यांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोप करताना शिवाभाऊ नरंगले यांनी भावी भोकर विधानसभा चे आमदार तुम्हीच राहणार, अतिशय साधेपणाने राहून काम करण्याची पद्धत आहे. असे सांगून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे संचलन माजी तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी सुभाष तेले यांनी केले. व आभार सुमेश फुगले यांनी मानले. यावेळी जिल्हाअध्यक्ष उत्तर चे प्रशांत इंगोले, सर्व पत्रकार बांधव, वंचित बहुजन आघाडी चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ओबीसी बांधव, अनेक त्यांचा चाहता वर्ग, नेते व कार्यकर्ते, खेड्या- पाड्यातील ग्रामीण भागातील कार्यकर्ते वर्ग उपस्थित होते. शेवटी भोजन व्यवस्था करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने