महागाई वाढवून गरिबांना लुटणाऱ्या मोदी सरकार विरोधात तीव्र संघर्ष करू : गोविदराव शिंदे नागेलीकर

 महागाई वाढवून गरिबांना लुटणाऱ्या मोदी सरकार विरोधात तीव्र संघर्ष करू : गोविदराव शिंदे नागेलीकर

  


भोकर (प्रतिनिधी ) कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असताना मोदी सरकार इंधन व गॅसच्या किमती वाढवून गरिबांची लूट करत आहे. मुठभर बड्या लोकांच्या हितासाठी काम करणाऱ्या मोदींच्या काळात सर्वसामान्य जनता भरडली जात आहेत. गरिबांना लूटणाऱ्या मोदी सरकार विरोधात यापुढील आंदोलन  काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरुन तीव्र संघर्ष करेल,” अशी घणाघाती टीका काँग्रेस जिल्हा अध्यक्ष गोविंदराव शिदें नागेलीकर यांनी केली  

           तालुका काँग्रेस व शहर कॉंग्रेस च्या वतीने भोकर मध्ये काँग्रेस कार्यालयापासुन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक , शिवाजी चौक , लहुजी चौक मार्ग म्हैसा रोड वरिल पेट्रोल पंप पर्यंत सायकल रॅली काढून इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी केली. यावेळी नांदेड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नाागेलीकर यांच्या नेतृत्वाखाली आज १३ जुलै २०२१ रोज मंगळवारी भोकर तालुका व शहर  काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सायकल रॅली काढून इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी केली. या रॅलीत कृषी व पशु संवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावनगावकर जिल्हा परिषद नांदेड , जिल्हा परिषद सदयस्य प्रकाशराव देशमुख भोसीकर ,काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष भगवान दंडवे, भोकर तालुका  काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष तथा कृ उ बा स सभापती जगदिश पाटील भोसीकर ,नांदेड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुभाष पाटील किन्हाळकर, माजी सभापती गोविंद बाबा गौड पाटील,मार्केट कमिटीचे संचालक रामचंद्र मुसळे,माजीनगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर, सामाजिक कार्यकर्ता  शेख युसुफ भाई, माजीनगर अध्यक्ष साहेबराव सोमेवाड ,काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष खाजु भाई ,उपसभापती  गणेश राठोड , माजी नगरसेवक मनोज गिमेकर , सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष माधवराव अमृतवाड ,मिर्जा ताहेर बेग, बाबुराव आंदबोरीकर ,विक्रम क्षीरसागर, शेख नईम तळेगावकर ,संदीप गौड पाटील ,हनमंत पाटील कामनगावकर ,सिध्देश्वर पिटलेवाड, गौतम कसबे,सना ईनामदार,मधुकर गौवंदे, राजू पाटील दिवसीकर,गंपू पाटील, विलास हटकर , सुरेश कावळे ,फारुख करखेलीकर,गोविंद मेटकर,आंनद ढोले, एनएसयुआय तालुका अध्यक्ष विठ्ठल धोंडगे, आशु ईनामदार,आनंद ढवळे चिंचाळकर, काँग्रेस सोशल मिडीयाचे आदिनाथ चिंताकुटे , शारूख सौदागर, विकास क्षिरसागर , यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने