भोकर येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालया वरून 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी

आपली न्‍युज

दिनांक 07 जुलै 2021

सतिश भवरे

       भोकर (तालुका प्रतिनिधी) भोकर येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालया वरून 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी मिळाली असून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून तसे पत्र दि.८ जुलै 2021 रोजी निघाले आहे.

        भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात वाढत्या लोकसंख्या नुसार व वाढत्या रुग्णसंख्या नुसार सुविधा कमी पडत होत्या याबाबत गेली काही दिवसापासून भोकर येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर व्हावे अशी मागणी जोर धरीत होती. याबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकरावजी चव्हाण यांनी विशेष लक्ष घालून भोकर येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यासाठी मोठे प्रयत्न केले.

100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय: शासन आदेश

       महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग सहसंचालक आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांचे शासन निर्णय क्रमांक श्रेणी वर्धन 2020/ प्र. क्र. 208 आरोग्य-४ नुसार भोकर येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन करून 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी जागा अधिग्रहित करून बांधकाम व पद निर्मिती करण्यात यावे असेही आदेशात नमूद करण्यात आले असून प्रदीप बलकवडे अवर सचिव महाराष्ट्र शासन मुंबई यांनी हे पत्र प्रसिद्ध केले आहे.

पालकमंत्री ना.अशोकराव चव्हानांचे विशेष प्रयत्न

        भोकर विधानसभा मतदार संघात प्रलंबित राहिलेल्या विकास कामांसाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकरावजी चव्हाण यांनी विशेष लक्ष घातले असून भोकर शहर व तालुक्यात विकास कामे मोठ्या प्रमाणात मंजूर करण्यात आली . कामांना निधी उपलब्ध झाला . कामांची सुरुवातही झाली. रुग्ण सेवेसंदर्भात भोकर येथील ग्रामीण रुग्णालय लयास को विड संसर्ग पहिल्या लाटेच्या वेळी ग्रामीण रुग्णालयास ना. चव्हाण यांनी भेट दिली असता वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक मुंडे यांनी भोकर येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय झाल्यास रुग्णांच्या सेवेला मोठा फायदा होईल असे सूचित केले होते त्यावरून ना. चव्हाण यांनी विशेष प्रयत्न करून भोकर येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर केल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त केल्या जात आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने