दलीत अत्याचार प्रकरणी ऑलईंडीया पँथर सेनेचा अंदोलनाचा इशारा

दलीत अत्याचार प्रकरणी ऑलईंडीया पँथर सेनेचा अंदोलनाचा इशारा


भोकर प्रतिनिधी :

   सोलापूर जिल्ह्यातील मालवाडी ( बोरगाव ) व चंद्रपूर जिल्ह्यातील वनी ( खु ) झालेल्या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशि करुण आरोपी विरूद्ध कठोर कार्यवाही करण्यात यावी या साठी भोकर जि नांदेड येथे तहसिलदार यांना निवेदन देऊन झालेल्या घटनेचा तिव्र निषेध करण्यात आला .

   सोलापूर जिल्ह्यातील व चंद्रपूर जिल्ह्यातील मानवतेला काळीमा फासनाऱ्या घटनेत   जातीयवादी मानसीकतेतुन सोलापूर जिल्ह्यातील माळवाडी (बोरगाव ) येथे मातंग समाजातील व्यक्तीचा मृतदेह स्मशानात अंत्यविधी करण्या साठी नेला असता जातीय वादी गावगुंडांकुडन अंत्यविधी करण्यासाठी विरोध करुण जाती वाचक शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली तर दुसऱ्या घटनेत चंद्रपूर जिल्ह्यातील वणी ( खु ) येथे भानामतीच्या कारणा वरुन भर चौकात अनुसुचीत जातीच्या महीला व वृद्धास भर चौकात मारहाण करण्यात आली म्हणुन महाराष्ट्र सरकार हे जातीय वादातुन होणारे अत्याचार रोखण्या साठी अपयशी ठरल्याचे दिसुन येत असल्याने जातीय अत्याचाराच्या घटना वाडत असल्याने भोकर येथील ऑलईंडीया पँथर सेनेचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष निखील हंकारे , राजेश चंद्रे, कुलदीप तोडे, दिलीप रायभोळे, भाऊराव कावळे, पत्रकार उत्तम कसबे, विजय कुमार लोखंडे, धम्मशिल तोडे, महेंद्र काणिंदे, गोदावरी बाई वाघमारे, यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या करून कार्यवाहीची मागनी केली

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने