ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने स्मशान भूमी प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन

 ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने स्मशान भूमी प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन.


आपली नुज :

नांदेड.

दि.17/ 09/ 2021


नांदेड जिल्ह्यातील अनुसूचित जाती व जमाती चा स्मशान भुमिचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब यांना ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी माळशिरस तालुक्यातील प्रकरण व पांगरी हदगाव तालुक्यातील प्रकरण असे अनुचित प्रकार घडत असताना ते घडू नये यासाठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व जमाती चे स्मशानभूमीचे प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने प्रत्येक गावात जागेचा प्रश्न असेल अशा ठिकाणी भूमी अधिग्रहण करून व स्मशानभूमीची जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी स्मशानभूमी बांधकाम व संरक्षक भिंत बांधून  जागा निश्चित करून ते प्रश्न सोडवण्यात यावे.यामागणीसाठी चे निवेदन जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आले आहे .जर यासमोर असा प्रश्न निर्माण झाला तर अंत्यविधी आपल्या कार्यालयासमोर करण्याचा पवित्रा घेतला जाईल असे आशयाचे पत्र देण्यात आले आहे.

 यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष भिमराव बुक्तरे , युवा जिल्हाध्यक्ष सुरेश सावते, नांदेड तालुकाध्यक्ष सतीश हिंगोले, लोहा तालुका प्रवक्ते प्रदीप वाघमारे, ता.उपाध्यक्ष नांदेड आनंद पाटील, साहेबराव सरोदे शहराध्यक्ष अर्धापुर, नागेश हिंगोले, स्वप्नील हिंगोले व आदी जण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने