ऑल इंडिया पँथर सेनेने जपली सामाजिक बांधिलकी

 ऑल इंडिया पँथर सेनेने जपली सामाजिक बांधिलकी



आपली नुज : प्रतिनिधी

दि. 09/10/2021

   नांदेड : एकदरा ग्रा.प ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुकाध्यक्ष तसेच एकदरा ग्रा.प सदस्य सतीश हिंगोले  यांच्या वाढदिवस निमित्त सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाच्या काळात जी ऑक्सीजन विना अनेक जनतेस आपला प्राण गमवावा लागला होता ही परिस्थिती भविष्यात घडू नये. म्हणून सामाजिक बांधिलकीतून ऑल इंडिया पँथर सेनेचे नांदेड तालुका अध्यक्ष यांनी आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा प्रांगणात वृक्ष लागवड करून सामाजिक बांधिलकी जपली.व प्रत्येक व्यक्तीने किमान दरवर्षी आपल्या शुभप्रसंगी  एक झाड रोपन करून त्याची जोपासना करावी असे यांनी सांगितले येणाऱ्या काळामध्ये ऑक्सिजन तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून आपल्या गावाच्या खुल्या मैदानात ,बांधावर ,रस्त्याच्या दुतर्फा बाजूला ,गावातील गायरान जमिनीवर ,शाळेच्या प्रांगणात सर्व गावकऱ्यांनी म्हणून श्रमदानातून वृक्ष लागवड करून सामाजिक समतोल जपावा. यातून निसर्गाचा समतोल व निसर्गाची पाणी पातळी वाढण्यास मदत होते असे प्रतिपादन सतीश इंगोले एकदरेकर यांनी केले  जिल्हा परिषद शाळा एकदरा येथे वृक्ष लागवड करून वाढदिवस साजरा करण्यात आला. 

   त्यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष भिमराव बुक्तरे  उपस्थित होते.तर  विशेष उपस्थिती एकदरा गावचे सरपंच गंगाधर बोखारे ,शाळेचे मुख्याध्यापक  कुलकर्णी सर, गोधने सर,पतंगे सर ,संतोष चौरे  यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी शाळेतील विद्यार्थी व गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने