बोरवाडी येथे प्रत्येक घरी वॉटर फिल्टरचे वाटप.
आपली नूज : सतीश भवरे
मोबाईल : 8446273667
भोकर ( नांदेड )
भोकर : वर्ल्ड व्हिजन इंडिया या नामांकित संस्थेच्या वतीने आदिवासीबहुल बोरवाडी येथे तहसीलदार राजेश लांडगे यांच्या हस्ते व वर्ल्ड व्हिजन संस्थेचे प्रकल्प अधिकारी श्याम बाबू पट्टापू यांच्या प्रमुख उपस्थितीत ३८० हजार रुपये किमतीचे ३८० वॉटर फिल्टरचे वाटप करण्यात आले.गावातील प्रत्येक घरी वॉटर फिल्टरचे वाटप कुटुंब प्रमुखांना करण्यात आले. यामुळे आदिवासीबहुल गोरगरीब जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळून आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत होणार आहे. वर्ल्ड व्हिजनचे प्रकल्प अधिकारी श्याम बाबू पट्टापू हे उत्तम पद्धतीने नियोजन करून ग्रामीण आदिवासी भागातील गरजूंना विविध योजना पुरवीत असून त्यामुळे आदिवासी भागात समाधान व्यक्त होत आहे.
जागतिक महिला दिनी ८मार्च रोजी फिल्टर वाटप कार्यक्रम बोरवाडी येथे घेण्यात आला असून यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रकल्प अधिकारी श्याम बाबू पट्टापू यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिलांचे समाजातील योगदान या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.वर्ल्ड व्हिजन मॅनेजर श्याम बाबू पट्टापू यांनी सांगितले की,समुद्रवाडी, मसलगा, दिवसी बुद्रग, बेंबर आणि गारगोटवाडी या गावांमध्ये आम्ही हे वॉटरफिल्टर दिले आहेत. सर्व मुलांना सुरक्षित आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे त्यांच्या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. जेणेकरून मुलांना त्यांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करता येईल. तर तहसीलदार राजेश लांडगे यांनी वर्ल्ड व्हिजन संस्थेच्या कार्याचा गौरव करीत पिण्याच्या पाण्याचे महत्व सांगितले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच अनिता ताई, सदस्या भागेरथीबाई यशवंतराव वानोळे, महादू वागतकर, लोभाजी झाडे, किशन गायकवाड यांच्यासह उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व वर्ल्ड व्हिजनचे कर्मचारी इमा गावित उपस्थित होते.