सावरगांव ( मेट )येथे भारतीय बौद्ध महासभेची कार्यकारिणी जाहीर.
आपली नूज : सतीश भवरे
मोबाईल : 8446273667
भोकर ( नांदेड )
दि.8 मार्च 2022"भारतीय बौद्ध महासभा" भोकर तालुका शाखा अध्यक्ष पी.एम. तोडे सर ,तालुका सरचिटणीस बाबुराव सोनकांबळे, तालुका कोषाध्यक्ष प्रसाद शहाणे , संस्कार उपाध्यक्ष अप्प्पाराव येरेकार,संस्कार सचिव रमेश रावळे,सैनिक मेजर राजु दांडगे.यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली.
या निवड प्रक्रियेसाठी अध्यक्ष म्हणून पी .एम. तोडे सर यांची निवड केली. तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व प.पू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.व भारतिय बोध्द महासभेची कार्यप्रणाली या विषयावर रमेश रावळे यानी सखोल विचार मांडुन धम्मकार्य गतिमान करण्यासाठी धम्माचे अचारविचार अंगिकारुन स्वाभामानजागरत करावा असे अवाहान या वेळी केली. त्यानंतर सावरगांव ( मेट) येथील भारतीय बौद्ध महासभेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.भारतीय बौद्ध महासभेच्या ग्राम शाखा अध्यक्षपदी उपा.नागोराव लक्ष्मण सोनकांबळे तर सरचिटणीस म्हणून उपा.गौतम भोजराम सोनकांबळे व मारोती आडेलु सोनकांबळे यांची कोषाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.व या ग्राम शाखा सावरगावची कार्यकारिणी खालील प्रमाणे आहे . अध्यक्ष नागोराव सोनकांबळे,सरचिटणिस गौतम सोनकांबळे,कोषाध्यक्ष मारोती सोनकांबळे, संस्कार उपा.भिमरावसोनकांबळे, मायावती संजय सोनकांबळे,यशवंत सोनकांबळे,पुंडलिक सोनकांबळे,दिगांबर सोनकांबळे,शांताबाई सोनकांबळे,बाबुराव आढाव,चंद्राबाई सोनकांबळे,लक्ष्मण डोंगरे,अम्रुता सोनकांबळे,संभाजी सोनकांबळे,लताबाई सोनकांबळे यांची निवड करण्यात आली.सर्व नवनिर्वाचित कार्यकारणिस जिल्हा संस्कार सचिव अप्पाराव येरेकार यांनी पुढील पिढी संस्कारमय घडविण्यासाठी तथागताचे विचार आंगीकारुन शुध्दा व्हावे असे विचार गिताच्या माध्यमातुन विचार मांडले.
या वेळी गावातील आदी जनसमुदाय उपस्थित होते . उपा. संजय सोनकांबळे यांनी सुत्रसंचलन केले आणि सर्वांनी मिळून नवीन कार्यकारिणीस व धम्मकार्यास शुभेच्छा दिल्या.सरणेतेय गाथा नंतर कार्यक्रम संपवण्यात आला .