भोकर येथे जागतिक महिला दिन साजरा
आपली नूज : सतीश भवरे
मोबाईल : ८४४६२७३६६७
भोकर ( नांदेड )
दि. ८ मार्च २०२२ रोजी शास्त्रीनगर/गांधीनगर अंगणवाडी भोकर येथे बाल विकास नागरी प्रकल्प क्रमांक ३ नांदेड अंतर्गत भोकर शहरातील अंगणवाडी व सेविका यांच्या वतीने या प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी श्री.मिलिंद वाघमारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ८ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून बालविकास प्रकल्प क्रमांक तीन चे पर्यवेक्षिका सौ. शेठे मॅडम यांनी भूषविले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी सौ. नारलावार मॅडम, ज्येष्ठ विधितज्ञ राठोड मॅडम,ज्येष्ठ विधितज्ञ श्री. शिवाजी कदम, दैनिक लोकमत प्रतिनिधी,राजेश वाघमारे साहेब,भोकर न्यूज लाईव्ह चे संपादक रमेशजी गंगासागरे हे यावेळी उपस्थित होते. प्रथम राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ तसेच पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते या आदर्श महिलांचे पूजन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली आरोग्य ,आहार,महिला सबलीकरणासाठी कायदेविषयक माहिती बालसंगोपन,बालगुन्हेगारी,,बेटी पढाव बेटी बचाव, अंधश्रद्धा, याआधी विषयावर मार्गदर्शन करण्यात केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अंगणवाडी प्रकल्प कार्यालयाचे पर्यवेक्षिका सौ. शेटे मॅडम यांनी यांनी अंगणवाडीत येणार्या लाभार्थ्यांना आहार व आरोग्य तसेच अंगणवाडी क्षेत्रातील विविध लाभा विषयी उपस्थित लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.कुलकर्णी मॅडम यांनी केले तर आभार कांताबाई चंद्रे यांनी केले या कार्यक्रम यशस्वीतेसाठी भोकर येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विशेष मेहनत घेऊन या कार्यक्रम यशस्वी केला यावेळी शहरातील अंगणवाडी क्षेत्रातील महिला पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शेवटी सर्व उपस्थित महिलांना व बालकांना अल्पोपहार देऊन कार्यक्रम संपविण्यात आला.