महिलांचे आरोग्य हिच कुटुंबांची संपत्ती - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे प्रतिपादन.
आपली नूज : सतीश भवरे
मोबाईल : 8446273667
भोकर (नांदेड )
महिला दिनाचा कार्यक्रम जिल्हास्तरीयवर वेगवेगळ्या सेवाभावी संस्था व जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नांदेडचे जिल्हाधिकारी मा. डॉ. विपीन इटनकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की महिलांचे आरोग्य हिच कुटुंबांची संपत्ती आहे. महिलांना वेळोवेळी आरोग्य सुविधा पुरविल्या पाहिजे व महिलांच्या आरोग्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन महिलांच्या आरोग्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे . तसेच जिल्हाधिकारी सरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की जिल्हा आरोग्य यंत्रणा महिलांसाठी विशेष सुविधा पुरवित आहे सुविधा पुरवित आहे. तसेच महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन महिलांना प्रोत्साहित करून स्त्री-पुरुष समानतेवर भर दिला . हा कार्यक्रम रेल्वे व्हि.आय.पी. हॉल रेल्वे स्टेशन नांदेड येथे आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमामध्ये नांदेड रोटरी क्लबचे पदाधिकारी, वर्ल्ड व्हिजन इंडिया , चाईल्ड लाईन , तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय , रेल्वे कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष मा. डॉ. सारिका झुंजारे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
वर्ल्ड व्हिजन इंडियाचे प्रकल्प अधिकारी मा. श्यामबाबू पट्टापू यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन महिलांना व मुलांच्या प्रगतीसाठी वर्ल्ड व्हिजन प्रत्येक क्षेत्रात हातभार लावत आहे असे संबोधित केले. रोटरी क्लबच्या डॉ. शुभांगी पाटील यांनी आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच रोटरी क्लबच्या डॉ. श्वेता अवाधिया व डॉ. सुचिता भुरे यांनी महिला सुरक्षा व आरोग्य सुविधेवर मार्गदर्शन केले तसेच अध्यक्ष परिवार सेवाभावी संस्थेचे पि.डी. जोशी पाटोदेकर यांचेही मार्गदर्शन लाभले . वर्ल्ड व्हिजनने प्रकाशित केलेल्या बाल संरक्षण पुस्तकांचे लोकार्पण जिल्हा दंडाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आले. महिला बाल विकास अधिकारी मा. डॉ. अब्दुल रशीद शेख , रेल्वे सुरक्षा बलाचे अनिल कुमार तिवारी, मुख्य स्वास्थ्य निरीक्षक नवल कुमार , लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अमितकुमार गुप्ता , पोलिस निरीक्षक सुरेश उनावणे , युनिसेफच्या पुजा यादव यांची उपस्थिती होती. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विद्या आळणे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.